Monday, September 7, 2026

 अब तुझसे भी नाराज़ हूँ मैं इसलिए,

तुझे देखा तो कोई और याद आया।

तेरे क़रीब था, फिर भी अजीब हालत थी,
पास रहकर भी कोई दूर याद आया।

तूने पूछा कि क्यों ख़ामोश हूँ इतना मैं,
क्या बताता कि कोई और याद आया।

तेरे आने से सजी महफ़िलें कुछ देर मगर,
तेरे जाने पर मुझे अपना घर याद आया।

अब किसी से भी शिकायत नहीं करता हूँ मैं,
जिससे रूठा था वही बार-बार याद आया।

तेरे क़दमों की आहट जब सुनाई दी मुझे,
किसी के लौटने का इंतज़ार याद आया।

तेरे जाने के बाद देर तलक सोचता रहा,
क्यों मुझे फिर वही इतवार याद आया।


Thursday, September 3, 2026

 जो सुनाती है मुझे चाँद-तारों की कहानी,


मैं उसको कहानी तेरी सुनाता हूँ।


वो कहती है, “भूल जाओ जो बीत गया है,”


मैं बीते हुए कल की ताज़गी सुनाता हूँ।


उसे यक़ीन है कि वक़्त सब भुला देता है,


मैं वक़्त के ही भीतर उसकी कमी सुनाता हूँ।


वो पूछती है, “मोहब्बत में क्या बचा आख़िर?”


मैं टूटे हुए दिलों की ज़िंदगी सुनाता हूँ।


Wednesday, August 26, 2026

 वो मेरे सामने बैठा तो रहा देर तलक,

दरमियाँ फिर भी कोई हिजाब रहा।

उसने जाते हुए बस इतना कहा, “ठीक हूँ”,
उसके लहजे में मगर कुछ तो अज़ाब रहा।

रात भर नींद नहीं आई तो समझ में आया,
मेरे कमरे में भी उसका ख़्वाब रहा।

वक़्त गुज़रा तो कई ज़ख़्म भी भरते गए,
मगर एक चेहरा था जो दिल में बेहिसाब रहा।


 कभी याद आऊँ मैं भी, वक़्त मिले तो,

कभी याद आओ तुम भी, वक़्त मिले तो।


किताबों में दबे ख़त आज भी साँसें लेते हैं,

उन्हें पढ़ लेना कभी, वक़्त मिले तो।


तुम्हारे शहर में जब फिर से बारिश होगी,

मुझे सोचना कभी, वक़्त मिले तो।


वो जो कुछ कह न पाया, कविता में लिख दूँगा,

मुझे सुन लेना तुम भी, वक़्त मिले तो।


बहुत अरसे से तुम्हारा कोई ख़त नहीं आया,

मुझे लिख देना कुछ भी, वक़्त मिले तो।

Thursday, August 20, 2026

 भाकरीसाठी रांगेत उभा राहतो माणूस,

भाषणात प्रत्येकाच्या हातात राज आहे.


कुणाच्या वाट्याला टाळ्या, कुणाच्या वाट्याला आक्रोश,

एकाच शहरातील प्रत्येकाचा वेगळा प्रवास आहे.


घरं मोठी होत गेली, माणसं छोटी झाली,

प्रत्येक दाराआड आपापला समाज आहे.


जिंकूनही रोज हरतो आपण स्वतःशीच आतून,

या जगण्याच्या खेळाला नेमका कुठला इलाज आहे?


चेहऱ्यावरच्या हास्याला फार अर्थ देऊ नको,

आत कुठे किती तुटलो, याचा कोणाला अंदाज आहे?

Wednesday, August 12, 2026

 जीते जी जिसे डर था मौत से,

मौत आई तो वो हँसता हुआ मिला।


उम्र भर जिसको माना मैंने रक़ीब,

आख़िरी पल वही देता दुआ मिला।


सच कहा तो हर किसी से रंजिश हुई,

झूठ कहा तो हर इक अपना मिला।


जिसे दुनिया ने समझा ख़ुशहाल,

उसके कमरे में तकिया गीला मिला।


घर लौटने की थी ख़ुशी बहुत मगर,

घर में इस बार एक कमरा कम मिला।

Tuesday, August 11, 2026

 हक़ीक़त न सही, ख़्वाब में मिले

वो मुझे किसी भूले जवाब में मिले


बहुत दिनों से चेहरे पे धूप ठहरी थी
वो एक शाम किसी नक़ाब में मिले


न पूछ हाल मेरा, बस इतना याद रहे
हम अपने-आप से थोड़े अज़ाब में मिले


वो एक लम्हा भी कितना अजीब लम्हा था
कि जैसे उम्र किसी एक किताब में मिले


मैंने चाहा था उसे सिर्फ़ एक बार मगर
वो बार-बार मेरे इंतिख़ाब में मिले


न जाने कौन-सा मौसम था उस मुलाक़ात का

कि उम्र भर के सभी रंग उस गुलाब में मिले

Sunday, August 9, 2026

 स्मरून पाहिले, विसरून पाहिले,

मनास कितीदा सावरून पाहिले.

तुझ्या आठवांची राख उराशी,
आणि निखारे पांघरून पाहिले.

निघून जाताना शहरातून तुझ्या,
पुन्हा एकदा वळून पाहिले.

तुझ्या नावाचे पत्र एक होते,
कितीदा पुन्हा उघडून पाहिले.

न बोललेल्या शब्दांच्या ओठांवर,
किती अर्थ होते वाचून पाहिले.

आपले होते जे काही क्षण ते,
एकट्याने मोजून पाहिले.

तुझी सवय मोडता मोडता,
मनाला कितीदा मोडून पाहिले.

 तुझ्या पैंजणांची लागताच चाहूल,

वाऱ्याचे ते झंकारणे.


तुझी चाहूल कोण घेऊन येते,

बंद खिडकीतून येते कसे चांदणे?


तुझे मौन अन् माझी शांतता,

शब्दांविना एकमेकांना वाचणे.


दिवस-रात्रीचे चक्र चालते पण,

तुझ्या आठवणींचे कुठे थांबणे?


किती माझा हट्ट तुला विसरावे,

किती हट्ट मनाचा तुला आठवे


जुन्याच जखमांच्या नव्या वेदना,

कुरवाळता येते हासणे.


आयुष्याने वर दिला "माग जे काही हवे!",

तुझे नाव घेऊन थांबले मागणे.


तुझे स्वतःला करता आभाळ माझ्यासाठी,

उन्हातही वाटते मनाला चांदणे. 

Saturday, July 4, 2026

 खिडकीशी टेकून उभा होता पाऊस…


ढगांनी अलगद

आभाळाच्या केसांत

पांढरा मोगरा माळला होता.


पहिला थेंब

लोखंडी गजांवर अलगद निनादला,

जणू एखाद्या सतारीची

पहिलीच झंकार.


तू हसलीस…

आणि माझ्या छातीत

चिमण्यांनी

ऋतूभराचं घर बांधायला घेतलं.


तुझ्या खांद्यावर

जेव्हा मी शांतपणे डोकं टेकवलं,

तेव्हा बाहेरचा पाऊस

फक्त बरसत नव्हता…


तो आपल्या श्वासांच्या लयीवर

एखादी जुनी गझल

हळुवार गुणगुणत होता.


तुझे केस

पहिल्या पावसानंतर

दरवळणाऱ्या मातीचा सुगंध होते.


तुझा श्वास

आल्याच्या चहातून उठणाऱ्या

उबदार वाफेसारखा…


आणि तुझी जवळीक…

श्रावणाच्या सरीसारखी नव्हे,

तर

दोन ढगांनी

एकमेकांत विरघळून जावं

तशी.

Monday, June 29, 2026

 मी मांडीवर ठेवुनी डोके तुझ्या,

ऐकवाव्या गुलमोहराच्या कविता माझ्या.

ऋतू नसावेत कवितेमध्ये,
तव नयनांचा रंग असावा.
गार मंद त्या वाऱ्यामध्ये,
तुझ्या केसांचा गंध असावा.

शब्द नकोत फार बोलके,
मौनालाही छंद असावा.
मनात उमलत्या भावनांना,
ओठांपाशी बंध असावा.

Sunday, June 28, 2026

 मीही असतो अधुरा,

तूही असतीस अधुरी,

म्हणूनच कदाचित

आपली भेट लिहिली असेल नियतीने,

दोन अपूर्ण कथा

एक संपूर्ण कविता व्हावी म्हणून.


 रात्र नसती अंधारलेली,

तू शेजारी असतीस तर.

उजळली असतीच रात्र,
तू शर्वरी असतीस तर.

श्वास झाले असते सूर,
तू बासरी असतीस तर.

गंधाळले असते अक्षर,
तू अक्षरी असतीस तर.

Friday, June 26, 2026

 हर दर पे उम्र भर की सदाएँ भी बेअसर,

शायद अभी अपने ही मकाँ की तलाश में हो।


मंदिर भी गए, मस्जिदों से लौट आए तुम,

फिर किस ख़ुदा की तलाश में हो।


दरिया ने बस इतना ही पूछा बहाव में,

किस बेनिशाँ किनार की तलाश में हो।


जो खो गया था, वो तो तुम्हारे ही पास था,

फिर किस और आसमाँ की तलाश में हो।


शायद ये सफ़र ख़त्म न हो उम्र भर,

जब तक तुम अपनी ही तलाश में हो।

Friday, June 19, 2026

 

उगा भटकलो कुठे कुठे मी कित्येक वर्षे,

रस्ते घरी वळू लागले, तू भेटल्यापासून.


दुःखास झाकून ठेवले हसऱ्या मुखवट्यांमध्ये,
डोळे खरे बोलू लागले, तू भेटल्यापासून.


नभ तेच, चंद्र तोच, तीच रात्र होती तरी,
ताऱ्यांना अर्थ येऊ लागला, तू भेटल्यापासून.


ना मागितले मी प्रेम, ना तू दिलेस वचन,
तरी आयुष्य खुलू लागले, तू भेटल्यापासून.


Thursday, June 18, 2026

 जिंदगी मला तू एक सोपा प्रश्न दे

का मला नेहमी निवडावे लागते

प्रत्येक हातात एक भाकरीचा कोर दे
का चिमुकल्यांना आकाशी बघावे लागते

देऊनी सर्वस्व माझे मी कंगाल जाहलो
अन आता प्रेमही उसने मागावे लागते

प्रेम किनाऱ्याने करावे नदीवर कितीही तरी
तिला शेवटी सागराशीच मिसळावे लागते


Monday, June 15, 2026

 (1)

स्पर्शाविना स्पर्शून जाणे तिचे,

जसा श्वासांत मिसळावा रातराणीचा गंध;


न जाणे कसे बिलगून जाणे,

जसा सागराच्या मिठीत विरघळावा चंद्र.


(2)

जगला की लिहिता येतं, एवढंच असतं खरं,

जखमांच्या ओठांवरच असतं कवितेचं घर.


सुखाच्या वाटसरूंना जगण्याची काय खबर,

वेदनांच्या पाऊलखुणांतच असते अनुभवांची सफर.


(3)

पावसाच्या सरींचा मारा फार आहे,

श्रावणाचा नदीला केवढा भार आहे.


तिच्या प्रवासाला आहे कोणता आधार?

सागराच्या भेटीचा उराशी विचार आहे.


एकरूप होणे तिचे सागराशी,

तिचा जणू हाच श्रृंगार आहे.


(4)

मेरी आँखों में कोई ख़्वाब सजाओ फिर से,

तुम मेरी बाँहों में आकर छूट ही जाओ फिर से।


एक मुद्दत से पड़ा हूँ मैं ख़ामोशी ओढ़े,

अपने होंठों से मेरा नाम बुलाओ फिर से।


एक मुद्दत से जो ठहरा है धुआँ आँखों में,

मेरी पलकों को ज़रा नम सा बनाओ फिर से।


जो मेरे साथ चले थे किसी बरसात के दिन,

उन लम्हों को मेरी यादों में लौटाओ फिर से।

Sunday, June 7, 2026

 का जाणे कसे हात माझे बांधले,

तुला बिलगण्याची आस बाकी राहिली.

गारवा का वाटतो नकोनकोसा,

का वाटते ऊन माझी सावली.


का दिसतात आरशात चेहरे धूसर,

का तुझी चाहूल मात्र स्पष्ट राहिली.

का सागरालाही तहान लागते,

का नदी किनाऱ्यावाचून वाहिली.

दिल ने भी रख छोड़ा है इक इंतज़ार तेरे लिये,

नजरेत दडवला मी चांदण्यांचा व्यापार तुझ्यासाठी।


दर्द ने सीखा दिया आँखों को मुस्कुराना भी,

अश्रूंनी घडवला मग मोत्यांचा हार तुझ्यासाठी।


चाँद ने दरिया में अपना अक्स उतारा चुपके से,

लाटांनी केला पहारा सारी रात्र तुझ्यासाठी।


दिल की वीरानी में इक शेर अभी तक ज़िंदा है,

मीच जाळला त्याचा प्रत्येक उच्चार तुझ्यासाठी।


धूप ने पत्तों पे लिख दी एक सुनहरी दास्ताँ,

फांद्यांनी धरला त्या कथांचा आधार तुझ्यासाठी।

Thursday, June 4, 2026

 थोड़ी देर रुक जाओ, अभी तो रात बाकी है,

खामोशियों की तह में एक मुलाकात बाकी है।


तुम अगर सुन लो तो मुकम्मल हो ये अफ़साना,

मेरी ख़ामोशी में अभी कुछ बयानात बाकी हैं।


चाँद भी ठहरा हुआ है आसमान की देहलीज़ पर,

सितारों की आँखों में कुछ सवालात बाकी हैं।


यूँ तो नज़रों ने कई दफ़ा कह दी दास्ताँ अपनी,

मगर दिल के सफ़्हों पर कुछ एहसासात बाकी हैं।


वक़्त की रेत ने ढक दिए हैं कई क़िस्से मगर,

तेरी यादों के अभी कुछ निशानात बाकी हैं।


न जाओ इस क़दर कि रात अधूरी रह जाए,

कि इस रात में अभी कुछ जज़्बात बाकी हैं।

Thursday, April 30, 2026

मैंने तुझसे तो बे-लौस ही तअल्लुक़ चाही,  

तेरी जानिब से भी अपनी न कोई तस्दीक़ चाही।


तुझसे मोहब्बत की ये शिद्दत ही काफ़ी थी मुझे,  

और न इस दिल ने कोई और तौफ़ीक़ चाही।


दिल ने हर ख़्वाब तेरे नाम से रौशन कर के,  

ख़ुद से भी फिर न कोई और तहरीक़ चाही।


तेरे क़दमों की सदा में ही मुझे मिला सुकूँ,  

और दुनिया से न कोई भी तरतीब चाही।


तू मिला तो लगा जैसे मिली हो मंज़िल मुझको,  

और फिर तक़दीर से भी कोई न तदबीर चाही।


~ Vishal