Sunday, August 9, 2026

 स्मरून पाहिले, विसरून पाहिले,

मनास कितीदा सावरून पाहिले.

तुझ्या आठवांची राख उराशी,
आणि निखारे पांघरून पाहिले.

निघून जाताना शहरातून तुझ्या,
पुन्हा एकदा वळून पाहिले.

तुझ्या नावाचे पत्र एक होते,
कितीदा पुन्हा उघडून पाहिले.

न बोललेल्या शब्दांच्या ओठांवर,
किती अर्थ होते वाचून पाहिले.

आपले होते जे काही क्षण ते,
एकट्याने मोजून पाहिले.

तुझी सवय मोडता मोडता,
मनाला कितीदा मोडून पाहिले.

No comments:

Post a Comment