Sunday, August 9, 2026

 तुझ्या पैंजणांची लागताच चाहूल,

वाऱ्याचे ते झंकारणे.


तुझी चाहूल कोण घेऊन येते,

बंद खिडकीतून येते कसे चांदणे?


तुझे मौन अन् माझी शांतता,

शब्दांविना एकमेकांना वाचणे.


दिवस-रात्रीचे चक्र चालते पण,

तुझ्या आठवणींचे कुठे थांबणे?


किती माझा हट्ट तुला विसरावे,

किती हट्ट मनाचा तुला आठवे


जुन्याच जखमांच्या नव्या वेदना,

कुरवाळता येते हासणे.


आयुष्याने वर दिला "माग जे काही हवे!",

तुझे नाव घेऊन थांबले मागणे.


तुझे स्वतःला करता आभाळ माझ्यासाठी,

उन्हातही वाटते मनाला चांदणे. 

No comments:

Post a Comment