Sunday, June 7, 2026

 का जाणे कसे हात माझे बांधले,

तुला बिलगण्याची आस बाकी राहिली.

गारवा का वाटतो नकोनकोसा,

का वाटते ऊन माझी सावली.


का दिसतात आरशात चेहरे धूसर,

का तुझी चाहूल मात्र स्पष्ट राहिली.

का सागरालाही तहान लागते,

का नदी किनाऱ्यावाचून वाहिली.

No comments:

Post a Comment