Monday, June 15, 2026

 (1)

स्पर्शाविना स्पर्शून जाणे तिचे,

जसा श्वासांत मिसळावा रातराणीचा गंध;


न जाणे कसे बिलगून जाणे,

जसा सागराच्या मिठीत विरघळावा चंद्र.


(2)

जगला की लिहिता येतं, एवढंच असतं खरं,

जखमांच्या ओठांवरच असतं कवितेचं घर.


सुखाच्या वाटसरूंना जगण्याची काय खबर,

वेदनांच्या पाऊलखुणांतच असते अनुभवांची सफर.


(3)

पावसाच्या सरींचा मारा फार आहे,

श्रावणाचा नदीला केवढा भार आहे.


तिच्या प्रवासाला आहे कोणता आधार?

सागराच्या भेटीचा उराशी विचार आहे.


एकरूप होणे तिचे सागराशी,

तिचा जणू हाच श्रृंगार आहे.


(4)

मेरी आँखों में कोई ख़्वाब सजाओ फिर से,

तुम मेरी बाँहों में आकर छूट ही जाओ फिर से।


एक मुद्दत से पड़ा हूँ मैं ख़ामोशी ओढ़े,

अपने होंठों से मेरा नाम बुलाओ फिर से।


एक मुद्दत से जो ठहरा है धुआँ आँखों में,

मेरी पलकों को ज़रा नम सा बनाओ फिर से।


जो मेरे साथ चले थे किसी बरसात के दिन,

उन लम्हों को मेरी यादों में लौटाओ फिर से।

No comments:

Post a Comment