मी मांडीवर ठेवुनी डोके तुझ्या,
ऐकवाव्या गुलमोहराच्या कविता माझ्या.
ऋतू नसावेत कवितेमध्ये,तव नयनांचा रंग असावा.गार मंद त्या वाऱ्यामध्ये,तुझ्या केसांचा गंध असावा.
शब्द नकोत फार बोलके,मौनालाही छंद असावा.मनात उमलत्या भावनांना,ओठांपाशी बंध असावा.
No comments:
Post a Comment