उगा भटकलो कुठे कुठे मी कित्येक वर्षे,
रस्ते घरी वळू लागले, तू भेटल्यापासून.
दुःखास झाकून ठेवले हसऱ्या मुखवट्यांमध्ये,
डोळे खरे बोलू लागले, तू भेटल्यापासून.
नभ तेच, चंद्र तोच, तीच रात्र होती तरी,
ताऱ्यांना अर्थ येऊ लागला, तू भेटल्यापासून.
ना मागितले मी प्रेम, ना तू दिलेस वचन,
तरी आयुष्य खुलू लागले, तू भेटल्यापासून.
No comments:
Post a Comment