Sunday, September 27, 2026

 सांग स्पष्ट ते, इशाऱ्यात बोलू नको


जमणार नाही उलगडणे कोडे मला


दाखवाया जगाला मंचावरती शेला दिला


मंचाखाली पायातले मारले जोडे मला


घालू शकणार नाही तू मोहिनी आता मला


कळू लागले तुझे डावपेच थोडे मला


मी ऐच्छिकतेने सर्व धर्म नाकारले


कोण तू, ठरवून एका जातीशी जोडे मला


No comments:

Post a Comment