तुझे सारे रंग माझ्यात मिसळू दे
मी तुला माझा निळा रंग देतो
तू जिंकलेली बाजू घेऊन जा सारी
मी तुला हरण्याचा ढंग देतो
तुझ्या स्पर्शात शब्द हरवले ज्या क्षणी
मी तुला त्या क्षणाचा अभंग देतो
No comments:
Post a Comment