एका अनामिक चित्रकाराच्या
चित्राकडे बघत असताना
मला भयंकर घाबरायला झालं
हात थरथरायला लागले
कुणीतरी मला माझ्याशिवाय ओळखतंय
या जाणीवेनेच झालो घामाचिंब
काही काही चित्रकारांकडे
असते म्हणे सुपरपॉवर
कसं कळलं असेल त्याला तरीसुद्धा?
कसं चितारलं त्याने कॅनव्हासवर
हे चित्र
कसं कळलं असेल त्याला
चहाचा कप
कपावरचे ओठांचे ठसे
गिटारचा अचूक रंग
गुलमोहराची फुलं
आकाशातील चंद्र
मला इथून लवकर निघून गेलेलंच बरं…
No comments:
Post a Comment