फुलांची स्तुती केली तुझी उपमा देऊन,
फुलांनाही लाजवले तुझे नाव घेऊन.
तुला पाहता कळले फुलांचे सौंदर्य,
ऋतूही बहरून गेला तुझ्या सहवासात येऊन.
तुझ्या अत्तराची गोष्ट सांगितली वाऱ्याला,
तोही गंधाळला तुझ्या अंगणातून जाऊन.
तुझ्या येण्याने कळले घरालाही असते मन,
उंबरठा वाट पाहतो दिवसभर डोळे लावून.
तुला लिहिताना पुन्हा शब्द अपुरे पडले,
कविताच राहिली शेवटी तुझ्यात विरघळून.
No comments:
Post a Comment