Saturday, November 7, 2026

 

सुचले मला न काही, लिहिता न काही आले,

माझे लिहिणेही तुझ्यासवेच गेले.

तू दूर गेल्यावर मज इतकेच कळले,

माझे असणेही तुझ्यासवेच गेले.

जगतो जगात थोडा शहाण्यासारखा,

माझे वेडेपणही तुझ्यासवेच गेले.

माझे अंतर्मन कुणासमोर उघडू,

मौनाचे बोलणेही तुझ्यासवेच गेले.

कशी करू सवय मी तुजविन जगण्याची,

जगण्यातले जगणेही तुझ्यासवेच गेले.

No comments:

Post a Comment