Wednesday, November 18, 2026


तू मैत्रीण बनून माझ्या आयुष्यात आलीस

पण देवदूतच झालीस

माझ्याचसोबत माझी पुनर्भेट घडवून आणलीस

मला शब्द दिलेस

माझी कविता दिलीस

माझ्यातल्या कवीला जिवदान दिलंस


तुझ्या सोबतीत मला अंधाऱ्या रात्रीही आवडायला लागल्यात

पावसात परत चिंब भिजायलाही आवडायला लागलंय

सौमित्रच्या कविता वाचायला लागलोय

दिदींची गाणी ऐकायला लागलोय


तुझ्याशी भेटायची नेहमी ओढ लागलेली राहते

तुझ्याशी बोलून सर्व मन मोकळं करायचं असतं

तू समोर असलीस की हृदयात धडधडायला होतं जोरात

आणि तुला मिठीत भरलं की स्पंदनं शांत लयीत गुणगुणत राहतात


तू इतकं काही दिलंस

आणि मी मात्र तुला काही देऊ शकलो नाही


देवदूताला माझ्यासारख्या मर्त्य माणसाने काय द्यावं?

माझ्याकडे तुला द्यायला काही नाही


काही पुस्तकं,

मी

आणि या कवितेशिवाय…

No comments:

Post a Comment