Thursday, December 8, 2016

कवयित्री शारदा पोटे यांची मनापासून माफी मागून. ..
◆ ◆◆

तू तिथे होतीस उभी
वाट तुझीच बघितली मी ही
तू न झालीस माझी पण
मी ही कुणाचा झालो नाही

वर्षे सरली दिवसांबरोबर
पण थांबलेला हा क्षण आहे
अजूनही तुझ्याच मध्ये
गुंतलेले हे मन आहे

दिसेल बघ डोळ्यांत माझ्या
प्रतिमा तुला तुझीच
नाव माझे न हिरावले मी
अजूनही तुझ्या नावामागेच आहे

तू आहेस माझीच फक्त
मला जाण आहे
तू तिथेच असल्याचेही भान आहे
तुझ्या मध्येच गुंतलेला
माझाही प्राण आहे

एक पाऊल टाक तू
एक मी हि टाकतो
रस्त्याच्या तुला
मध्यात भेटतो

ये जवळ ये, नको
स्वप्न नि आभास फक्त
तहानलेल्या मलाही,
हवीय तुझी मिठीच घट्ट

© विशाल इंगळे. ..

◆ ◆◆

मूळ रचना -

मी अजून तिथेच आहे
तुला याचे भान नाही
मी अजून तिथेच आहे
तुझी झाले नाही तरी
वाट पहात उभीच आहे
वर्षे सरली दिवसही सरले
तहानलेला जीव आहे
प्राण डोळ्यांत आणिक
ओठी तुझे नाव आहे
तनाने साथ सोडली पण
मन फक्त तुझे आहे
तुझ्या कुशीतल्या उबीची
फक्त त्यास आस आहे
स्वप्न पहाते तूला खुणाविते
तुला त्याचे भान नाही
मी अजून तिथेच आहे .......

शारदा

No comments:

Post a Comment