Wednesday, December 21, 2016

'हाक दे' म्हंटलं होतं नं?
कारण मला
तुला भेटायचं होतं. ..
तुझ्याशी बोलायचं होतं. ..
तुझ्या बद्दल ऐकायचं होतं. ..
माझ्या बद्दल सांगायचं होतं. ..
तुझ्या गोष्टींवर तुझ्याच सोबत
हसायचं होतं. ..
चोरून-लपून एकट्यात
टेरिस वर भेटलो असतो. ..
इकडच्या तिकडच्या साऱ्याच
गोष्टिंवर बोललो असतो. ..
मी गंमत म्हणून तुझी
टिंगल उडवली असती. ..
खोटं-नाटंच मग कदाचित
तू ही रुसली असती. ..
मी मनविण्याचे
प्रयत्न असते केले. ..
ना-ना शक्य-अशक्य
प्रोमिसेस असते दिले. ..
सारं सारं हे आता
आठवणीतच आहे. ..
मैत्रीच्या नात्याची खरी
हीच गंमत आहे. ..
प्रेमात पडायचं कुणाच्या
हे ठरवता येत नाही. ..
माझं तुझ्यावर प्रेम आहे
हे सांगताही येत नाही. ..
प्रत्येकालाच कुठे कळतं?,
नजरेतलं बोलणं. ..
'हाक दे केव्हाही,
मी जवळच असेल तुझ्या'
इतकंच सांगता येतं. ..
.
म्हंटलं होतं नं?, 'हाक दे'. ..

© विशाल इंगळे. ..

No comments:

Post a Comment