Tuesday, December 6, 2016


खूप वर्षांनंतर जेव्हा
या वळणावरून वळशील
इतिहासात जावून मला
तुझ्यासोबत बघशील

काहीसा जुना
काहीसा नवा रस्ता असेल
सारे असतील-नसतील सवे
तुझ्या फक्त मी नसेल

हि पायवाट अशीच
असेल गजबजलेली
ती रात्रही असेल
अशीच भिजलेली

वळून बघशील मागे
मी दिसणार नाही
तुझा माझा रस्ता
आता मिळणार नाही

© विशाल इंगळे

No comments:

Post a Comment