केलेत किती प्रयत्न तिजवर लिहायचे,
शब्दांत तिला मांडणे जमले तरीही नाही. ..
चाळली असंख्य आजवर पुस्तके मी,
पर्यायी शब्द तिजला दिसले तरीही नाही. ..
© विशाल इंगळे. ..
◆ ◆◆
तुटलेल्या ताऱ्यांचं
आणि माझं
सेम आहे
अगदी 'तुटलेल्या' पासून. ..
तिने कुणाच्या तरी
मिठीत असताना
मागितली असेल 'विश'
छपरावर बसून. ..
चंद्राला कसं जमतं
ताऱ्या-ताऱयांचं
आकाश वेगळं करणं?
दोन ताऱ्यांना जोडणं,
आणि तिसऱ्याला तोडणं. ..
ताऱ्यांनी ताऱ्यांना 'काही'
करायचे प्रकाशित;
ताऱ्यांनीच ताऱ्यांना, हि
तोडण्याची नवी रीत. ..
एक तारा वेगळा
इतरांपासून ठेवून. ..
© विशाल इंगळे. ..
No comments:
Post a Comment