Sunday, October 25, 2026

 वाटलं तर नोंदव गुन्हा तू माझ्यावर,

तू नसतानाही कविता लिहिलीय तुझ्यावर.

मी तुझ्या आठवणींना हद्दपार करायचं ठरवलं,
पण मनानेच पुन्हा खटला भरला माझ्यावर.

तुला विसरण्याचे कितीतरी मार्ग शोधले मी,
प्रत्येक रस्ता येऊन थांबला तुझ्या दारावर.

आता माझ्या कवितांना दोष देऊ नकोस तू,
तुझंच नाव उमटतं अजुनी प्रत्येक अक्षरावर.

तुझ्याविरुद्ध एकही पुरावा नाही माझ्याकडे,
तरी मन रोज नवे आरोप ठेवतं तुझ्यावर.


No comments:

Post a Comment