Anamika
From the Heart. ..
हो, मी नशेत आहे. ..
आहे मी नशेत. ..!
पण नशेत कोण नाही. ..?
जगण्यासाठी सगळ्यान्नाच नशेची गरज असते. .. सगळ्यान्ना कुठल्या ना कुठल्या नशेची तलब असते. ..
कुणाला पैशाची नशा आहे,
कुणाला प्रेमाची नशा आहे,
कुणाला कुटुंबाची
तर कुणाला यशाची. ..
त्या नशेसाठीच आपण जगतो. ..
तुम्ही पण कुठल्यातरी नशेत असाल. ..
नक्की च. ..!
आयुष्यात जेव्हा तुमची ही नशा उतरेल. .. तेव्हा तुम्ही पण अश्याच कुठल्यातरी दुसऱ्या नशेच्या आहारी गेलेले असाल. ..!
मानगुटी वर बसलेल्या भुतासारखी माणसाला नशा चिकटून च राहते. ..!
काही ही झाल तरी नशा फार वाईट. .. मग ती कशाचीही असो. ..! पण नशेपासून सुटका होनं अशक्य आहे. .. अन्न, वस्त्र, निवारा या प्रमाणे नशा ही पण जगण्यासाठी ची मूलभूत गरज आहे. ..
नशेत आहोत तो पर्यंत सगळं ठीक आहे, नशा उतरली की आपणच उद्ध्वस्थ केलेल्या आपल्या आयुष्याचं चित्र आपल्या नजरे समोर राहील. ..
म्हणून मी नशेत च असतो......!
- विशाल
No comments:
Post a Comment