Anamika
From the Heart. ..
सरींना पावसाच्या गॅलरीत
फुलांसोबत बोलताना ऐकलं. ..
म्हणे काल त्यांनी तुला
पावसात भिजताना पाहिलं. ..
ऐ खरंच का तू काल
पावसात भिजलीस?
तुला आठवतंय न पहिल्यांदा तू
मला पावसात च भेटलीस?
तुला आठवतंय एकदा भिजल्यावर तू
थंडीने कडकडत होतीस?
आणि मला घट्ट तू
घेतलं होतंस मिठीत?
पावसात च घेतलं होतं न तुझं
पहिल्यांदा चुंबन?
पावसातच भिजलेले आपल्या
शेवटच्या भेटीचे क्षण. ..
सरींना पावसाच्या गॅलरीत
फुलांसोबत बोलताना ऐकलं. ..
म्हणे काल त्यांनी तुला
पावसात भिजताना पाहिलं. ..
तुझं बरं आहे तू
भिजलीस तरी पावसात. ..
तू गेल्यापासून मला तर केलंय
पावसानं ही परकं. ..
© विशाल इंगळे
No comments:
Post a Comment