Anamika
From the Heart. ..
माझ्या ह्र्दयात प्रतिमा तुझी
वटवृक्षाची मुळे जमिनीत घट्ट रुजावीत तशी
आणि वाढत जावी खोल पृथ्वीच्या गर्भापर्यंत
प्रेमाच्या शोधात तसा तुझ्यात गुंतलेलो मी
© #heartbeats
( P.S. - All this poems are already published in "मनापासून मनापर्यंत. ..!" E-Magzine. ..
Check out here :
http://gdmanapasunmanaparyant.blogspot.in/?m=0
-------------------------
-------------------------
काल थंडि खुप होती
गारवा अंगावर काटे आणत होता
हवेचा प्रत्येक स्पर्श तुझी
आठवण करुन देत होता
वाटलं काश तु माझ्यासोबत असतीस
अंगावर तुझी पांघरुण तर असती
ऐवढ्या थंडितहि तुझ्या मिठित ती
रात्र उबदार असती. ..
- विशाल
-------------------------
वाटतं वादळ हे हि नाहि विध्वंसक
माझ्या मनाच्या वादळापेक्षा
त्सुनामीही काहिच नाहि
स्वप्नांना वाहुन नेणाऱ्या
आसवांच्या लाटांपेक्षा
माहितेय तु नसणारेय नजरेसमोर आता
डोळेच न उघडावसं वाटतं
खोल तळाशी सागराच्या कोठेतरी
नेहमी करिताच हरवावसं वाटतं
तु गेल्यावर सोडून,
अंधाराशीच झालीय मैत्री
तुझ्याविना आता जगण्यासारखे काहिच नाहि,
वाटतात तुटल्यासारखी
जीवनाशीही नाती
तुझयाविना आता
जगायचं तरी कशासाठी. ..?
- विशाल
-------------------------
गैलेरीत खुललेली माझ्या
काल गुलाबाची फुलं होती
विखुरलेल्या आयुष्याप्रमाणे माझ्या
आज सारीच हिरमुसलेली होती. ..
जेव्हा जेव्हा तुळशी वरचा दिवा
लावण्यास अंगणात गेलो
सरीत अवकाळी पावसाच्या
दिव्यासगट ओला झालो. ..
घरामागच्या नदीकाठी
पक्षी उडताना बघितले होते कधी तरी
स्वप्ने वाहताना बघितली
कालच्या पुरात सारी. ..
कालपर्यंत जिथे स्वप्नांचा
रंगमहाल होता
घरापेक्षा या स्मशानाच्या
पडक्या भिंतीच ठीक होत्या. ..
शेजारचा खाटीक एका घावात कोंबळा
मारायचा
मला मात्र नियतीने सोडले फक्त अर्धा गळा कापून
बळि म्हणून दगडाच्या देवासमोर
दिलं तडफडत फेकून. ..
चांदोबाच्या लग्नात काल
तार्यांची वरात होती
ढगांआत आज सारी
झाली गडप होती. ..
स्वप्ने तुटावी तशी सारी
नाती तुटत गेली
आयुष्याच्या पतंगाची
दोर सुटत गेली. ..
घराकडे जाणार्या रस्त्यावर कमीत कमी काल
काजव्यांचा प्रकाश तरी होता
कुठलं घर, कुनाचं घर
अंधारात कुठेतरी आज
विशालच हरवला होता. ..
रोज अंधारात मी
माझाच शोध घेतो
रात्र, चन्द्र, तारे,
सावलीचा विनोद होतो. ..
दरवेळी स्वतहाच्या मी
सावलीशी लढत असतो
आयुष्य नेहमी जिंकतं
आणि नेमका मी हरत असतो. ..
काश, मी थोडा
अजुन दुबळा असतो
हरून परिस्थितीशी
मेलो तरी असतो. ..
नविन ठिकाणी म्हंटला
फ़ोडेन मी टाहो
सकाळी लक्षात आलं
मी त्याच डबक्यात आहो. ..
अनवाणी चालत होतो तरी
डोक्यावर गीता होती
रात्री झोपलो होतो ज्या ठिकाणी
ती माझ्या शब्दांची चिता होती. ..
ज्याच्या मागे धावत होतो
एक चकवा होता
आज कळलं इथे
चुप राहण्यातच शहाणपना होता. ..
- विशाल
-------------------------
काल रात्री स्वप्नांत माझ्या चांदोबा
आला होता
एकाकिपनाच्या ग्रहनाने पडला काळा
होता
म्हणे सारं फक्त दुःख तुलाच नाही
सखिशिवाय एकटा आकाशात आहे मी ही
कहानिची त्याच्या सुरुवात मग झाली
दारू च्या दोन पेग सोबत स्मशानात च बैठक झाली
आयुष्याच्या संगीतातही एक दुःखाचा राग आहे
चंद्र असलो तरी माझ्यावर ही दाग आहे
गरज असली आपली की सारे जवळ येती
म्हणे, आज काल मित्रा सारी अशी च असतात नाती
कुनाशीही जास्त जवळीक साधायची नसते
मैत्री ही आजकाल फक्त कामापुर्ती करायची असते
दगडाच्या देवापुढे मागतो कसली भीक तू?
आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिक तू
हृदय बंद पडलं की देहाची लाश होते
काही वेळ का हो ना त्याची चिता ही
प्रकाश देते
चितेची करून शेकोटी बसू नको तू बाळ
तुझ्या आयुष्यातही येईल ऊद्या नवी सकाळ
- विशाल
-------------------------
ढगामागे पोर्णिमेच्या राती ही लपला
का असा चांदोमामा तू माझ्याशी रुसला?
तशी ही आयुष्यात माझ्या रोज च
अमावश्या होती
कालच्या वादळा सोबत सारी तुटली होती नाती
समजुन घेणारा मला फक्त तू च एक होता
थोडा का हों ना अंगनात माझ्या तुझाच प्रकाश होता
असं काय चुकलं माझं एकदा तरी सांग तू
अनाथ लेकरापासून तुझ्या असा नको रूसू
- विशाल
-------------------------
निखार्यांवरही चालण्या इतकं
तुझ्या प्रेमानं बळ दिलंय
हवी हवीशी वाटते प्रत्येक वेदना
मिळालेली या प्रेमाच्या वाटेवर
बस्स श्वास बनुनी तू माझ्यात रहा
हृदयाची स्पंदने बनून जाणीव करून देत रहा
मी जिवंत असल्याची
चांदण्याची दाहकता आणि सुर्याचा
ओलावा
काहीच कळत नाही आजकाल
वाटतं जसं मी जगतंच नाही वास्तवात
- विशाल
-------------------------
"नकोत खोटि स्वप्ने
नकोत चंद्र तारे
साथ असेल तुझी
तर झोपडितच ठेव ना रे
महालाची आशा नाहियेय मला
मिठित तुझ्या फक्त जगायंच मला. ..
जगु शकते तुझ्याशिवाय पण मी
पण तुझ्याशिवाय जगणे व्यर्थ आहे
तुझ्यासोबत जगलेल्या प्रत्येक
क्षणाला अर्थ आहे. .."
बोलता बोलताच ती अचानक शांत झाली
पाणावलेल्या डोळ्यांनी आमची नजर एक झाली
"जिथे फक्त आपण दोघंच असु
दुर कुठेतरी घेउन चल मला. ..
असा मला तु छळतोस का रे. ..?"
बोलायला शब्द उरलेच नव्हते
हरवले न जाने शब्द कुठे
ओठांवरचे माझ्या सारे. ..
- विशाल
-------------------------
कितीतरी वेळ बसलो होतो मी...
समुद्राच्या किनार्यावर...
एकटाच...
आठवनींच्या सोबत...
क्षितिजाकडे बघत...
भयानक संध्याकाळ होती...
आणि सोबतीला...
थकून...
तुटून...
पडणारा सूर्य...
रडणारा सूर्य...
अश्रूच त्याचे...
जणू समुद्राचे सर्व पाणी...
खारं झालं असेल न जाने...
कितीतरी माझ्यासारख्यांच्या अश्रूंनी...
उचंबळुन येणारी भरती...
आणि परतीस निघालेले पक्षी...
बस्स्स...
एकीकडे क्षितिजावर...
आकाश पृथ्वीचं मिलन होत होतं...
दुसरीकडे मात्र एक पाखरू...
एकटंच तळमळत होतं...
आयुष्यात अंधार पसरवत...
सूर्य ही बुडून गेला...
लाटा शांत झाल्या...
पानी संथ...
उरलो फक्त मी...
आणि माझा एकांत...
वाट बघत राहलो मी...
अख्खी रात्र...
तारे मोजण्याची उगाच थट्टा करत...
कधी ढगाआड दडलेल्या चंद्रासोबत...
तर कधी स्वतः सोबतच बडबडत...
पण...
तू आलीच नाहीस...
- विशाल
-------------------------
येईल न पक्षी परत घरट्याकडे?
अंगणातला गुलमोहर फुलेल न पुन्हा?
समुद्रकिनार्यावर उमटेल
आपल्या दोघांच्या पावलांचे ठसे,
येतील न ते सारे क्षण पुन्हा?
रोज संध्याकाळी दोन चंद्र असतील न?
एक आकाशात,
एक माझ्यासोबत...
चांदण्यांनी गजबजलेलं असेल न आकाश पुन्हा?
दरवळेल न चंदनाचा गंध?
तुझी साद घेवून येईल न हा वारा?
सकाळी सकाळी जाग येईल
पक्ष्यांच्या किलबिलाटीने,
उगवेल न सूर्य आशेची किरने घेवून?
- विशाल
-------------------------
खरंच जाणलंस तू मला?
पाणी लपवून पापण्यांखाली
ओठांवर हसू फुलविले मी...
हसणाऱ्या ओठांना सोडून कधी
डोळ्यांत डोळे टाकून बघितलंस?
तुझ्याकडे सरसावनारा हात
तुझ्याच हाताची वाट बघत होता...
वाटलं नाही कधी?
बघावं एकदा हात हातात घेवुन?
गुलमोहराच्या झाडाखाली कितीतरी
क्षण
घालविले असतील न आपण...
फुलांनी सांगितलं नाही काहीच कधी?
कितीतरी गोष्टी बोलायच्याच राहून
गेल्या...
न बोलता ही कळतं न तुला?
मग हिच गोष्ट का नाही कळली?
तुझ्यापेक्षा ही जास्त चांगल्याने ओळखतो मी तुला,
असं बोलता बोलता बोलून गेलास...
पण चालण्याच्या वेगात
तू जवळुन निघुन गेलास...
आणि मी राहिली एकटीच मागे
चुकून बघशील म्हंटलं वळुन एकदा तरी
पण तू निघून गेलास सरळ
एकदा ही न बघता वळुन
अगदी नजरेआड होईपर्यंत...
खरंच जाणलंस तू मला?
- विशाल
-------------------------
काही काही पानं
कोरीच बरी असतात...
म्हणूनंच पुस्तकातलं
कुठलं न कुठलं पान कोरंच असतं...
मी पण एक पान कोरंच ठेवलं होतं...
मुद्दामच...!
पण आज रहावलंच नाही...
उठलो आणि ओरखडल्या,
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
रात्रीतल्या आठवणींच्या सावल्या...!
लिहिल्यावर वाटलं
पान जरा जास्तच काळं झालंय कदाचित...
काही शब्द खोडावी म्हंटलं
आणि ओढल्या उभ्या आडव्या रेषा...!
ऐवढी खोडताड?
आता फक्त पान राहिलंय
फाडून फेकन्याच्या लायकिचं...
फाडून गोळा केला आणि दिलं फेकून
कचरापेटीत...
फाटलेलं पुस्तक कोण हाती घेइल?
कोण वाचणार या छिन्नविछिन्न अवस्थेतील
विस्कटलेली कविता...?
देवाजवळच्या दिव्यावर अचानक लक्ष गेलं...
आणि पेटवली चिता
पुस्तकाच्या एक एका पानाची...
आता त्या कोऱ्या पानांवर
कधीच लिहिणार नाही...
सांगणार ही नाही कुणाला
देवघरातल्या कागदाच्या राखेची कहानी...
काही पानं जशी असतात तशीच बरी
असतात...
कोरीच...!
त्या पानावरचे शब्द
फक्त लिहिणाऱ्यासाठी असतात...
पानावर नाही, मनावर कोरलेले...!!!
- विशाल
-------------------------
बस एकच खंत वाटते
तुला समजुच शकलो नाहि मी कधी
तुझ्यामाझ्यामध्ये अबोला नेहमीच दुरी वाटते,
तुझ्यावर केलेली प्रत्येकच कविता अपुरी वाटते;
भाव तुझ्या डोळ्यांमधला
शोधु शकलोच नाहि मी कधी
जेव्हा येतेस समोर खोटेच हसु गालांवर तुझ्या,
डोळे का पाणावलेले असतात तेव्हा तुझे?
प्रश्न नेहमीच पडतो टोचुन जातो मनाला,
का देतेस एकाकीपण मलाहि हे तुझे;
कदाचित मानले नसेलच आपले
मनाने तुझ्या कधी
- विशाल
-------------------------
कधी चैतालीतल्या फुलांचा मोहोर
कधी पानगळीतल्या नीष्पर्ण
गुलमोहरासारखी
कधी पहाटे पाखरांची
किलबिल किलबिल चिवचिवाट
कधी सायंकाळच्या शांत एकांतासारखी
कधी चांदण्यांची सोनेरी किरणे
कधी सागराच्या भरतीसारखी
अशी कशी तू?
मला कळतंच नाही. ..
- विशाल
-------------------------
तुझ्यात आणि माझ्या कवितेत
ऐवढा दुरावा का आहे माहितेय?
मी करू शकतो विश्लेषण
माझ्या प्रत्येक कवितेचं
कवितेतील प्रत्येक ओळीचं
आणि प्रत्येक शब्दाचं सुद्धा
तुला जाणण्याचा वसंता
मी करतोय प्रयत्न फक्त...
मी करू शकतो कविता
एकाकी चंद्रावर
अंधार्या रात्रींवर
पावसांच्या घनदाट सरींवर
ग्रीष्माच्या दाहक सूर्यावर
हिरव्यागार झाडाच्या
वाळलेल्या फक्त एका पानावर
चैतालीच्या पालवीचं रहस्य मात्र
मला कळलंच नाही अजुन...
लिहू शकतो मी
स्मशानाच्या पडक्या भिंतींवर
भिंतींच्या प्रत्येक विटेवर
जळणार्या चितेवर
चितेच्या झालेल्या राखेवर
आणि विझलेल्या दिव्यावर सुद्धा
बघितलीच नाही पण
तुझ्या सकाळी फुलपाखरे
आणि फूललापाखरांचे रंग...
माहित नाही का करतात सर्व
तुझं नेहमीच गुणगान
मला तर असह्य होतो
कोकिळेचा कर्कश आवाज
तोडाविशी वाटतात ही
माझ्यावर हसणारी उद्धट फुले
जमत नाही इतरांसारखं
सुन्दर कल्पनेच्या शुन्यात रमणं
आणि कधीही माझ्याशी
न जुळलेल्या तुझ्यावर लिहिणं...
- विशाल
-------------------------
न जाने का रुसलाय हा पाउस?
तू गेल्यापासून...!
माझ्यापासून दूर च असतो तो
चार हात...
तू गेल्यापासून जमलंच नाही
पावसांत भिजणं...
मी गैलरी त असलो की बरसतो तो
अगदी मनसोक्त...
जशी मातीशी भेट च नव्हती झाली त्याची
कित्येक दिवसांपासून...
पण मी अंगणात आलो की का कोण जाने
पाउस बरसत च नाही...
- विशाल
-------------------------
वाटतं एक दिवस आयुष्य
कारण नसताना घालवावं...
फिरत रहावं असंच उनाडकं
डोंगर रानातून...
चालत रहावं
धाड धाड
कशाचीही पर्वा न करता...
बघावं किती तापतोय सूर्य
रागाच्या भरात...
किती चटके देईल ही माती...
किती ताकद आहे वाऱ्यात...
एक दिवस जगावं
तत्व बित्व सोडून...
एक दिवस बघावं प्रवाहाच्या
उलट्या दिशेनं पोहून...
चन्द्र,सूर्य,वादळ,वारा यांना
कंटाळलोय मी फार...
स्वतःसाठीही एक कविता
करावीशी वाटते यार...
- विशाल
-------------------------
दारुचा शौक होता च कुनाला
तुझी च तलब फक्त माझ्या मनाला
म्हणून च येतो मद्यालयात रोज इथे
मद्याचा पेला करतो उगाच रीते
फुलांत अर्क असला की
फुलपाखरू त्यावर बसणारच
रुपाने घायाळ झालो तुझ्या
यात माझा काय दोष आहे?
दारूच्या नशेत नाही
तुझ्या नजरेच्या नशेत मदहोश आहे
खरं सांगतो मी कधी
पिउन खोटा बोलत नाही
चढवून घेतो तशी मला
दारुची नशा चढत नाही
- विशाल
-------------------------
जब डुब रहि थी कश्ती,
हाथ तो बढाया नहि
अब जनाजे पे मेरे
अफसोस बया ना करो
चाहे समझा था तुमने
पाणी मेरे अश्को को
पर कब्र पर मेरे हर रोज यूँ
मोतीयों को छलकाया ना करो
जिंदगी में जगहा ना दे पायी तुम थोडि
इसका गम कुछ नहि
जा तो चुका हुँ
अब जिंदगी से तेरे,
बार बार आ के यहाँ अब
फिर से रुलाया ना करो
© विशाल
-------------------------
समशान की उस कब्र कि तरह है
मेरी दास्ताँ, ऐ दोस्त
ना कफन पहनाने कोई आया,
ना कंधा देने कोई. ..
कहि रस्मो-रीवाज के नाम,
कहि रिश्ते, दस्तूर और मजबुरिओँ के नाम पर,
जिंदगी को वो मेरे अँधेरे के नाम कर,
दिल के तुकडे कर के वो चली गयी,
ना संभालने कोई आया,
ना समेटने कोई. ..
समाज ने भी ना जाने जिंदगी को
कैसे रंगो से भर दिया,
इश्क का रंग ही जो
यूँ फिका पड़ गया,
दूर कहि छोड़ गये उस चिराग कि तरह,
न जलाने कोई आया,
ना बुझाने कोई. ..
© विशाल
-------------------------
इश्क़ के समंदर में कई, कश्तीयाँ डूब जाती है,
न जाने इस राह पे, क्यूँ निकलते है राही?
मंजिल पे गौर करो, तो राहें खो जाती है. ..
होके भी जुदा तुझसे, मै जुदा न हो सका
बिछड के तुझ से मै, अपना न हो सका
दिन रात दिल में मेरे, तेरी आरज़ू होती है
खुदा से बस्स, तेरे बारे में गुफ़्तगू होती है
ज़िंदगी में मेरे सिर्फ, तेरे प्यार की रियासत है
यूँ तोड दिया दिल क्यूँ, इतनी सी शिकायत है
तेरे बिना आजकल, नींद भी नहीं आती
शराब उतर जाती है, तेरी याद नहीं जाती
हालत मेरी ले आई, क़यामत के आँख आंसू
उस कश्मकश को, किन लफ़्जों में बय़ा करू
सिसकते हुये ओठों से, क़यामत मुझ से बोली
ऐसा शख्स न देखा कभी, जिस्म, बिना रूह. ..
मैं बोला ऐ-क़यामत, हैं दुआ तुझसे
चाहता हूँ जिसे, मिला दे मुझे उससे
जो चाहे, वो क़हर तू ढ़ा ले
व़ोह ही हैं रूह मेरी और रूह जुदा मुझसे. ..
© विशाल
-------------------------
दिल की गलियारों में जब न नज़र तू आती हैं
साँसे थम जाती हैं और धड़कन रुक सी जाती हैं...
न जाने कैसी कशिश है तुझमें
दिन रात खोया रहता हूँ तुझमें
सब से पहले पूजा करता हूँ तुझको
भुलाउंगा कैसे तुझे पता नहीं मुझ को
पूरी रात आजकल
मैखाने में गुज़र जाती हैं...
शराब से भी तुझे भुलाया नहीं जाता
काश ए-दिल तू मेरे ज़िन्दगी में ही न आता
दो पल ही सही ज़िन्दगी जैसे तैसे कट जाती
चाहे रोशनी ज़िन्दगी में मेरे अंधेरा ही ले आती
अनजाने ही तू मेरी हर ग़ज़ल में आ जाती हैं...
- विशाल
-------------------------
दो बूंद न मुकद्दर में थे जब अक्स मेरा न था मुझ में ही कही
रूबरू हुआ कफ़न से मैं तो बारिश थमने को तैयार न हुई
दो बूंद न मुकद्दर में थे जब न थी साथ मेरी परछाई
रूबरू हुआ कफ़न से मैं तो बारिश थमने को तैयार न हुई
दो बूंद न मुकद्दर में थे जब भीख में मांगी थी खुशियाँ सर-ए-बाज़ार
रूबरू हुआ कफ़न से मैं तो बारिश थमने को तैयार न हुई
दो बूंद न मुकद्दर में थे जब ढूंढ़ता था खुद को गली गली
रूबरू हुआ कफ़न से मैं तो बारिश थमने को तैयार न हुई
दो बूंद न मुक्कदर में थे जब भटकता था रातभर जुगनुओं की तलाश में
रूबरू हुआ कफ़न से मैं तो बारिश थमने को तैयार न हुई
दो बुंद न मुकद्दर में थे जब रातें कट जाती थी यूँ ही तनहा
रूबरू हुआ कफ़न से मैं तो बारिश थमने को तैयार न हुई
-विशाल
-------------------------
देख कलियाँ खिली है कैसे
कल शाम जिसे तूने चूमा था
तेरे लिये या तुझे देखकर
आई है ये फूलों की बरखा?
भीगे बदन से ले अंगड़ाई
पंखुरियाँ मुस्का रही है
इस मौसम को और तन मन को
कैसे यह महका रही है
मैंने पूछा के फूलों से फिर
ये खुशबू लाई हो कहाँ से
उसने कहा उस दिल से
धड़कने तेरी धड़कती है जहाँसे
- विशाल
-------------------------
शमाओं के साथ परवानों को जलते देखा हैं
तुमसे कई ज्यादा मैंने श्याम को ढलते देखा हैं
यूँ बहकाने की तू कोशिश न कर
मोहब्बत की आग में कईओ को झुलसते देखा है
घर जलाके अपना जो
चांदनी के आगोश में आँगन आ बैठे
अँधेरी रात में उनको अकेले
सिसक सिसक के रोते देखा है
न जाने कितनों को फँसाया
अपने जाल में इस छलावें ने
इस मय समंदर से निकलने के लिये
कई शराबियों को तडपते देखा हैं
- विशाल
-------------------------
महाकाव्य लिहिणार्र्याने
जवळून बघितली असेल
धर्मव्यवस्था
अन्यायी वर्णव्यवस्था. ..
बंधनाच्या
धर्माच्या खोट्या
चौकटिच्या
बाहेर निघण्याचा
प्रयत्न ज्यांनी केला
धर्मव्यवस्थेने या
त्यांच्या कौशल्याचा घात केला. ..
महाभारत ही त्यांच्या
कौशल्याची गाथा
बंडाची
त्यांच्या
दुःखद प्रवासाची कथा. ..
नायक कर्ण-एकलव्य
होते स्वाभिमानी
जे मिळवले त्यांनी
मिळवले
सर्वच कौशल्यानी
स्वबळानी
कर्तुत्वानी. ..
शुद्र म्हणुन त्यांना
हक्कच मिळाले नाही
दानशूर
निस्वार्थी
कर्तुत्ववानांनी
कधी ते मागितले ही नाही. ..
व्यवस्थेविरोधी बंड करणारे
ते
समतेचे नेते होते
गुणवत्ते पुढे त्यांच्या
सारे
झाले दुबळे होते. ..
अधर्मास धर्म ठरवून
नियमांविरुद्ध जाऊन
त्यांचा घात केला गेला
महाकाव्याचा या असा
दुःखद
दुर्दैवी अंत झाला. ..
- विशाल
-------------------------
बाबा तुझ्या नेत्यांची
काय गती ही झाली?
सत्तेच्या लोभापायी
दोन दिशांनी गर्दी झाली. ..
मंत्रीपदाचं दाखवून आमीष
त्यांनी ह्यांना खेचलं
खासदारकीची लाच देऊन
तोंड ह्यांचं दाबलं. ..
संघर्ष संपला नाही अजूनही
पसरलेलं धर्माचं जाळं आहे
हृदयातील आग आणि एकीतच
आपलं बळ आहे. ..
बाबा तुझ्या नेत्यांना
नाही का हे कळलं?
बाबा या दलालांनी तुलाच विकलं
तुझ्या विचारांचा मांडणार्र्या बाजार
या भड्व्यांना
कुणी खेटरानं का नाही धुतलं?
बाबा तुझ्या विचारांना
आता इथे थारा नाही
विद्रोहाचा
क्रांतीचा आज तुझ्या
कुठेही वाहत वारा नाही. ..
तू चेतवलेला वणवा
ह्यांनी केला थंड आहे
तुझ्याच नावावर पुकारला ह्यांनी
तुझ्याच विरोधात बंड आहे. ..
- विशाल
-------------------------
भीती वाटते बाबा
बोलायची
आकांत ह्रदयातला
व्यक्त करण्याची
अन्यायाविरुद्ध
आवाज उचलण्याची. ..
मनात प्रश्न अनेक
पण
उत्तरे मात्र नाही
बाबा तुझ्या
लेकरांत ऐकी नाही. ..
दोन मुलांचे तुझ्या
दोन बाप असतात
कुणीही बसणारे
तुझ्या
तत्वात नसतात. ..
हाकेला येणारे
सभोवताली कुणी नाही
म्हणुन आज हिम्मत
बोलायची होत नाही. ..
बाबा
आज तू यांना
शिकवायला हवा होता
संघटनाचं महत्त्व
सांगायला हवा होता. ..
बाबा तुझी सारी
जेव्हा
लेकरे एक होतील
मनातील शब्द
ओठांवर येतील
जेव्हा कशाचीही
भीती उरणार नाही
शब्दांना माझ्या
तेव्हाच बळ येईल. ..
- विशाल
-------------------------
धुप में मंजिल की ओर
पसीने से सराबोर हो चले
दो बूँद न पूछे पानी ऐसे
अपने किस काम के
दो पल छाँव
पलकों पे बिछाये जो
ऐसे परायों से
जाती कौन पूछे
बड़ा मुश्किल होता है चलना
राह-ए-मंजिल
नंगे पाँव कडकती धुप में
चल के आये छालों पर पाँव के
गर मलहम लगाये कोई
हक़ क्या है अपनों का?
छिड़कते है जो जख्मों पे नमक यार के
के पूछे उनसे ये पराये
नाचीज से तेरा रिश्ता क्या है
बे रंग सी जिंदगी में रंग भरे कोई
ऐसे पराये से नाता कौन पूछे?
- विशाल
-------------------------
बाबा, बरंच काही तसंच आहे रे...
बदललेय ते फक्त मुखवटे
वास्तविकतेचे...
तेच चित्र थाटलंय नजरेसमोर, फक्त वेगळ्या
रंगात...
तू ओठांवर आहेस सर्वांच्याच,
फक्त शोधू नको मनात...
तीच विषारी व्यवस्था बांधून ठेवू पाहतेय...
फक्त कात टाकलीय आणि नव्या रुपात डसतेय...
वाटतं कधी कधी येत का नाही मरण...
नियमांच्या नावाखाली मांडल्या जाते
जेव्हा शब्दांचे सरण...
चहुकडे आसमंतात पसरलेलं निळं रक्त बघ...
बघ आक्रोशाची आग विझवणारे खोटे
संस्कृतीचे ढग...
सारं सारं तेच आहे....
दाबल्या जातो मनातला आकांताचा
निखारा...
तसाच राहतो ओठांवरचा विद्रोही वादळी वारा...
सारं सारं तेच आहे...
- विशाल
-------------------------