फुल स्पीड च्या फॅन खाली
घामाने चिंब भिजलेल्या अवस्थेत कडे फेरत
तुझा विचार करत असताना
तू उलगडत असशील कुणासमोर तरी
तुझ्या दैनंदिनीतलं आजचं पान
करत असशील त्याची विचारपूस
खेळत असशील
समेशन ऑफ आय लव्ह यू
फ्रॉम आय इज इक्वल टू वन टू इन्फिनिटी चा खेळ
जुळलेलं असेल जात, धर्म, पैसा, सेटलमेंट चं गणित
मी अजूनही तुझी सवय न तुटलेला
निराश, पराजित, खचलेला
अंधारात एकटाच रडत कुढत
सिगरेट च्या झुरक्या सोबत
तुझ्या आठवणी धूर करण्याच्या निष्फळ प्रयत्नात
प्रॅक्टिक्यालीटी समोर पराजित प्रेमाच्या सिद्धांताच्या चितेत
ऊब शोधण्याचा प्रयत्न करत असेल
No comments:
Post a Comment