Monday, March 9, 2020

तुझ्या प्रेमात का पडलोय
ते सांगता येणार नाही
पण तुला बघता क्षणी तू 
आपलीशी वाटलीस आणि मी 
तुझ्या प्रेमात पडलो
तुझे टपोरे डोळे
गुलाबी ओठांवरची नारंगी लिपस्टिक
छोटीशी काळी इअररिंग्ज
की तुझ्या आवाजातला भरभक्कम पणा
काय कारण असेल माहीत नाही
तुला उगाच मिठीत घ्यावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांत स्वतःला न्याहारावसं वाटतं
तुझा नाजूक हात हातात घेवून
किंवा केसांची बट सावरत मिठीत घेवून
तुझ्या हृदयाच्या स्पंदनांची चाहूल घ्यावी
तुझ्या ओठांच्या स्पर्शाने सारी
दुनियाच विसरून जावी
आपल्या श्वासांनीच 
प्रेमाची कबुली द्यावी
मला कवेत घट्ट घेवून तू
लहान मुलासारखं झोपी जावं
आणि मी रात्र जागून 
तुला बघत रहावं
असं वाटायला लागलंय 
का माहित नाही

- Vishal

No comments:

Post a Comment