Saturday, June 20, 2020


रिमझिम पावसात
तुझ्यासोबत भिजलेली संध्याकाळ आठवते
उधाणलेल्या समुद्राच्या लाटांमधून चालताना
बेभान वारा झालेले तुझे मोकळे केस
पावसाला दव बनवून झेलनारे तुझे ओठ
तुझ्या हाताचा उबदार स्पर्श
ओठी लताचं सागर किनारे
निसर्गाने आर डी बर्मन होवून दिलेली साद
तुझ्या डोळ्यात नाहीसा झालेलो मी
गुलाबी रंगाची ती एकच सायंकाळ असावी
आता जगजीत च्या गझल ऐकत जागलेल्या रात्रीत
ती संध्याकाळ 
आणि
त्या पावसाला 
साद घालत असतो


Sunday, March 29, 2020


फुल स्पीड च्या फॅन खाली
घामाने चिंब भिजलेल्या अवस्थेत कडे फेरत 
तुझा विचार करत असताना

तू उलगडत असशील कुणासमोर तरी
तुझ्या दैनंदिनीतलं आजचं पान
करत असशील त्याची विचारपूस
खेळत असशील 
समेशन ऑफ आय लव्ह यू
फ्रॉम आय  इज इक्वल टू वन टू इन्फिनिटी चा खेळ
जुळलेलं असेल जात, धर्म, पैसा, सेटलमेंट चं गणित

मी अजूनही तुझी सवय न तुटलेला 
निराश, पराजित, खचलेला
अंधारात एकटाच रडत कुढत 
सिगरेट च्या झुरक्या सोबत 
तुझ्या आठवणी धूर करण्याच्या निष्फळ प्रयत्नात

प्रॅक्टिक्यालीटी समोर पराजित प्रेमाच्या सिद्धांताच्या चितेत 
ऊब शोधण्याचा प्रयत्न करत असेल


Saturday, March 28, 2020


लोकांच्या गर्दीतून निसटणं तसं सोपं असतं
पण,
मनात गर्दी दाटू लागली की कुठे निघून जाणार?
पिंजऱ्यात कोंडलेल्या
तडफडनाऱ्या पक्षागत
आतल्या आत गुदमरत राहतो
तुझ्यासारखं 
प्रॅक्टिकल होता आलं असतं तर बरं झालं असतं
तुला जग बनवून 
साऱ्या जगाला मी दूर केलं स्वतः पासून
आता तू नसताना हा एकांत खायला सुटतोय
कपाटातल्या रोमान्स जेनर च्या नाॅवेल्स
इंस्टाग्राम वर 
तू सजेस्ट केलेल्या चॅनल्स वरच्या कपल्स इमेजेस ची फीड
रेकॉर्ड कलेक्शन मधली रोमँटिक गाणी
डेस्क वर लावलेला आपला फोटो
हातावर गोंदवून घेतलेलं तुझं नाव
कशाकशापासून दूर पळणार?
तू म्हंटलेलं पुस्तकी बोलू नको
मी कविता करणं सोडलं
मग तू म्हणालीस की तू फारच बोरिंग झालाय आता
खिशात दमडी नसतानाही फक्त तुला भेटायला म्हणून
मी अख्खं शहर पालथं घालून भर पावसात तुला भेटायला पायी आलेलो
आणि तू म्हंटलस की मी म्हंटलेलं का ये म्हणून
मी लग्नासाठी विचारलेलं तेव्हा 
कुठलंही कारण नसताना तू नकार दिलास
तुला मला पोसायचं नव्हतं
ना जबाबदारी स्वीकारायची होती
मी म्हंटलं की तुझ्याशिवाय जगू शकणार नाही
तू म्हंटलंस की ऑफिस वरून उडी मारून जीव दे
मनात अशी गर्दी झाली की वाटतं
साला आपण च च्युतिया आहोत
तुझाच चेहरा, तुझाच आवाज, तुझाच स्पर्श
तुझ्याच नावाचा विचार करत आहोत
जेव्हा तुला काही घंटा फरक पडत नाही
मी गर्दीलाच ओरडून सांगायचा प्रयत्न करतो
तुझे शेवटचे शब्द
फक ऑफ. ..!

Monday, March 9, 2020

तुझ्या प्रेमात का पडलोय
ते सांगता येणार नाही
पण तुला बघता क्षणी तू 
आपलीशी वाटलीस आणि मी 
तुझ्या प्रेमात पडलो
तुझे टपोरे डोळे
गुलाबी ओठांवरची नारंगी लिपस्टिक
छोटीशी काळी इअररिंग्ज
की तुझ्या आवाजातला भरभक्कम पणा
काय कारण असेल माहीत नाही
तुला उगाच मिठीत घ्यावसं वाटतं
तुझ्या डोळ्यांत स्वतःला न्याहारावसं वाटतं
तुझा नाजूक हात हातात घेवून
किंवा केसांची बट सावरत मिठीत घेवून
तुझ्या हृदयाच्या स्पंदनांची चाहूल घ्यावी
तुझ्या ओठांच्या स्पर्शाने सारी
दुनियाच विसरून जावी
आपल्या श्वासांनीच 
प्रेमाची कबुली द्यावी
मला कवेत घट्ट घेवून तू
लहान मुलासारखं झोपी जावं
आणि मी रात्र जागून 
तुला बघत रहावं
असं वाटायला लागलंय 
का माहित नाही

- Vishal

Sunday, February 23, 2020


तुझी आठवण येतेय असं नाही
तुझ्याशिवाय जगणं शिकलोय मी
फक्त कधी कधी वेळ जात नाही
एव्हढंच
स्वतः ला कामात गुंतवतो
मुद्दाम कुठल्यातरी मूव्हीज बघत बसतो
मुराकामी च्या एखाद्या पुस्तकात डोकावत
उगाच कुठलीतरी जुनी गाणी ऐकतो
वसंताचा वेध घेणं सोडलंय
पावसाची ही आतुरता राहली नाही
उगाच छतावर बसून
तारे ही मोजत नाही
ज्या वाटेवरून सोबत जायचो
ती वाटच सोडलीय
तुझ्या मिठीत परत यायची
आसही सोडलीय
पुस्तकांवर ची धूळ साफ करून
कपाटात लावलेत
गॅलरीत ले गुलाब ही आता
फुलायला लागलेत
लाइफ एकदम सॉर्ट झालीय असं वाटतं कधीतरी
मग एक झुळूक अंगावर येते कुठून तरी
मी एकटा आहे हे जाणवायला लागतं
हे भयानक कॉम्बिनेशन आहे
एकांत आणि रात्र
एकांतात लवकर रात्र सरत नाही
कधी कधी वेळ जात नाही
एवढंच. ..

- विशाल


Thursday, January 23, 2020

कधी माझी कविता म्यच्युअर होईल
तेव्हासुद्धा असशील तू
माझ्या कवितेत कवितेची
शेवटची ओळ बनून

शब्द हरवलेले नसतील
कविता विस्कटलेली नसेल
कवितेत भरकटलेला
मीही नसेल

शिशिर नसेल
रात्रही नाही
निराशेचा
उल्लेखमात्र ही नाही

तरीही मला सावरलेलंस तशीच
तिलाही गरज असेल तुझी
कधी माझी कविता म्यच्युअर होईल
तेव्हासुद्धा. ..

© विशाल