काल द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल लागला. .. आमच्या वर्गातून नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ दोन. .. कदाचित पूर्ण विद्यापीठातूनही एम.एस.सी. संगणकक्षास्त्र च्या द्वितीय सत्र परीक्षेत या वर्षी नापास झालेली ही च दोन मुले असावी. .. आणि पास झालेल्या मुलांच्या आणि यांच्या गुणांमधलं अंतर ही खुप जास्तच. .. त्या दोघांपैकी एक "तन्मयी" आणि दुसरा म्हणजे "आदित्य". .. दोघं पण क्लासमेट्स. .. कॉलेज च्या पहिल्याच दिवशी त्याने तीला पाहिलं आणि हिलाच आपण शोधत तर नव्हतो नं? असं काहिसं त्याला वाटलं. .. दोघांची ओळख झाली, ओळखीचं मग मैत्रीत आणि मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. .. तसं आपण हिच्या प्रेमात पडलोय हे तो त्यांची पहिल्यांदा नजरानजर झाली तेव्हाच सांगू शकला असता. .. प्रेम म्हणजे तशी ही एक निराळीच गोष्ट. .. प्रेमात न सांगता ही कळतं म्हणतात. .. तसं च काहिसं तिच्यासोबत ही झालं. .. म्हणजे त्याच्या मनात काय आहे, हे तिला कळलं नाही असं नाही, पण तरीही तिने तसंच भासविण्याचा प्रयत्न केला. .. त्याच्या प्रेमाला होकार द्यायलाही तिने वेळच लावला. .. शेवटी एकदाचा तिचा होकार मिळाला आणि त्याला पूर्ण जग मिळाल्यासारखंच वाटलं. .. पक्षी गातायेत आपल्यासाठीच, आपण चिंब भिजावं केवळ या करिताच पाऊस बरसतोय असंही काहिसं. .. सगळं बरोबर च जात होतं पण अचानक त्सुनामी यावा आणि पूर्ण गावच वाहून न्यावं तसं एक वादळ त्याच्याही आयुष्यात आलं. .. तसं ही ठरवलं तसं सगळं कुठे होतं आयुष्यात? दोघांत दुरावा निर्माण झाला, नाती तुटली आणि जग पुन्हा शून्यावर येवून थांबलं. .. कदाचित जिथुन सुरुवात केली असेल नं त्याच्या ही मागे. ..
परीक्षेचा वेळ होता, हे असं सगळं काही घडलं आणि साहजिकच त्याचा परिणाम परिक्षेवरही झाला. ..
"दी शो मस्ट गो ऑन" असं काहिसं कुणीतरी म्हंटलं होतं. .. आयुष्य चालत राहतं, आठवणी तश्याच राहतात, जखमा भरतात पण दाग तसाच राहतो, तो जात नाही, तश्याच. .. आयुष्य चालू च होतं. ..
आज सकाळी ६:४४ च्या आसपास आदित्यला सिद्धार्थ चा कॉल आला. .. सिद्धार्थ, तो पण यांचाच क्लासमेट. ..
"अरे, मी कैंटीन वर आलो होतो. .. तर मला तन्मयी दिसली आता, कुण्यातरी मुलासोबत चहा घेत आहे. ..", सिद्धार्थ उवाच. ..
सकाळी सकाळी झोप मोड करुन (थंडीचे दिवस, आदित्यची उठायची वेळ ८ नंतर), आपल्या महत्वाच्या कामातूनही वेळ काढुन अशी अचानक हार्ट अटैक आणावा अश्या बातम्या देणारे जीवलग मित्र ही असतात. ..
आदित्य सिद्धार्थला भेटला आणि त्याने काय घडलं ते ज्या पद्धतीने सांगितलं नं, त्यानंतर त्याने यू.पी.एस.सी. ची तयारी सोडून लेखक वगैरे व्हावं असंच आदित्यला वाटलं असेल. .. सस्पेंस. .. एक्सप्रेशन्स. ..
"अरे, मी नेहमीप्रमाणे अभ्यास करण्यासाठी लाइब्रेरी त आलो होतो. .. चहा घ्यावा म्हणून कैंटीन वर आलो. .. खिडकीतून एक बाइक येताना दिसली. .. मागे एक मुलगी बसली होती. .. ओढणीने चेहरा बांधलेला. .. इतक्या सकाळी सकाळी कैंटीन वर आलेली पहिली मुलगी. .. म्हणून बघावं म्हंटलं. .. बाइक थांबली. .. मुलाने बाइक पार्क केली. .. मुलीने चेहरयावरची ओढणी सोडली. .. मला वाटलं मुलगी ओळखीची दिसतेय, आपण हिला कुठेतरी नक्की बघितलंय. .. आणि मग लक्षात आलं की अरे ही तीच. .."
"मग?",आदित्यची जिज्ञासा आता आणखीनच वाढली होती. ..
"मग काय? ते तिकडे पलिकडच्या खिडकीजवळच्या टेबलवर जावून बसले, मी चहा संपविला, तो पर्यंत त्यांना बोलताना बघितलं, मी चहाचे पैसे दिले आणि बाहेर पडलो. .. आणि तुला कॉल पन केला होता नं त्यानंतर. ..?"
सिद्धार्थच्या चेहरयावरचे निरागसतेचे भाव बघुन आदित्यने फक्त कपाळावर काय तो हात मारला असेल, इतकंच. ..!
- #heartbeats
No comments:
Post a Comment