Sunday, August 16, 2015


रूम मधून ओमिका आणि तिच्या मैत्रिणींचा हसण्याचा आवाज येत होता. .. तन्मयीने दार ठोठावलं. .. आदित्यची अस्वस्थता आता वाढत होती. .. तन्मयीची ही तीच गत. .. कुणीतरी दार उघडलं. .. इतक्या लग्नाच्या गोंधळात ही त्यांना आतून कड़ी काढल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. .. तन्मयीने आत पाऊल टाकलं. .. तिच्या पाठोपाठ आदित्य ने ही रुममध्ये प्रवेश केला. .. समोर ओमिका. .. तिच्या मैत्रिणी तिच्या हातांवर मेहंदी रंगवत होत्या. .. आदित्य आणि तन्मयी ला समोर बघुन ओमिकाने मैत्रिणींना थांबायला सांगितलं आणि स्वतः त्यांची विचारपुस करायला सुरुवात केली. .. ओमिका च्या मैत्रिणी आधीपासूनच तन्मयी आणि आदित्याला ओळखत असाव्यात. .. ओमिका काही ही बोलली नाही तरी ही तिच्या मैत्रिणी रुममधून बाहेर गेल्या. .. जणू त्यांचं कुठल्या विषयावर संभाषण होणार हे त्यांनी हेरलं असावं. ..
काही वेळ ते प्रवास, करियर, मित्र-मैत्रिणी अश्या विषयांवर बोलत राहले. .. कॉलेजच्या आठवणी ही निघाल्या पण कुणीही सिद्धार्थ बद्दल बोललं नाही. .. काही वेळ असाच गेला. .. ओमिकाची लहान बहिण चहा आणि नाश्त्याचं घेवून आली. ..
"ओमिका, हे तुझ्यासाठी. .. सिड कडून. ..", शेवटी हिम्मत करुन आदित्य बोलला, पार्सल ओमिकाच्या हातात देत. ..
तिघांनीही एकमेकांकडे बघितलं. .. रुममध्ये शांतता. .. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. .. ओमिकाची बहिण चहाचे खाली कप्स आणि नाश्त्याच्या प्लेट्स घेवून रूममधून बाहेर गेली. ..
"आणि तो. ..? तो नाही आला. ..? ??",ओमिका. ..

आदित्य आणि तन्मयीची नजर एक झाली. ..

क्लिक. ..

पुणे. .. सरस्वती सांस्कृतिक कॉलेज. .. एस. एस. सी. . .. नाव वेगळं आणि वैशिष्ट्यही. .. फ़क्त सांस्कृतिक शिक्षण देणारं महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव महाविद्यालय. .. तसं ते भारतातील पण असं पहिलंच कॉलेज होतं. .. या आधी अश्या पद्धतीचं शिक्षण देणारी महाविद्यालये फ़क्त विदेशांतच असायची. .. कुण्या एका महान नाटककाराने आपली आयुष्य भराची पूंजी घालवून पुण्यात हे महाविद्यालय उभारलं. .. सुरुवातीला फ़क्त सांस्कृतिक विषयांची आवड असणार्यांनी इथे दाखले घेतले. .. संख्या फ़क्त १५. .. लवकरच काही अभ्यासकांना या विषयांचं महत्त्व लक्षात आलं. .. त्यांनी ते इतरांच्या लक्षात आणून दिलं. .. दाखला घेणार्यांची संख्या फ़क्त तीन वर्षांत दरवर्षी ३०० विद्द्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. .. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी या महाविद्यालयाला भेट दिली आणि भरभरुन प्रशंसा केली. .. महाविद्यालयाचं महत्व लक्षात घेवून सरकार कडून निधीही मंजूर झाला. .. वेगळा आणि स्वतंत्र अभ्यासक्रम, उच्च दर्जाचं शिक्षण यां मूळे महाविद्यालय लवकरच नावारुपास आलं. .. अनेक महान लेखक/कवी, नाटककार याच महाविद्यालयातून घडले. .. या महाविद्यालयातून शिक्षण घेणे लोकांना प्रतिष्ठेचं वाटायला लागलं. ..
दरवर्षी महाविद्यालयात स्टेट लेवल डिबेट कॉम्पेटिशन चं आयोजन व्हायचं. .. "ललित" या नावाने तो इवेंट जगप्रसिद्ध झाला. .. देशभरातून अनेक मराठी विद्द्यार्थी या कॉम्पेटिशन मध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक असायचे. ..

सिद्धार्थ ला लेखक व्हायचं होतं. .. नेहमीच. .. अगदी लहानपणापासून. .. केशवसुतांपासून नामदेव ढसाळ, शेक्सपीअर पासून चं. प्र. देशपांडे, पी. जी. वुडहाउस पासून चेतन भगत पर्यंत कितीतरी पुस्तके त्यानी वाचलेली. .. त्याचं सर्वात आवडीचं पुस्तक म्हणजे "लव इज रिअल". .. त्याशिवाय मृगजळ, वपुर्ज़ा, दुनियादारी, मृत्युंजय, विंझोळ, रश्मिरथी ई. त्याची मोस्ट फेवोरेट बुक्स. .. आंबेडकर, व पु काळे, पु ल देशपांडे, प्रीती शिनॉय, यशवंत मनोहर, चैताली आहेर इ. त्याचे फेवरेट लेखक/कवी. ..
सिद्धार्थने काही लिहायला सुरुवात केली की तो फ़क्त लिहत राहायचा, सगळं वेळ-भान विसरून. .. सिद्धार्थ चं लेखनही अप्रतिम होतं. .. सगळं सोडून फ़क्त वाचत रहावं असं. .. ललित लेखनामध्ये त्याचा हात कुणीच पकडु शकलं नसतं. .. वपुंना तो नेहमी आपल्या आदर्शस्थानी मानायचा. .. सामाजिक विषयांवर त्याने काही लिहिलं की ते वाचून सरळ काळजात कट्यार घुसावी असंच असायचं. .. सिद्धार्थचं लेखन मात्र त्याचे बेस्ट फ्रेंड्स आदिती आणि तन्मयी, त्याची डायरी आणि काही मोजक्या इवेंट्स पर्यंत च मर्यादित राहलं. .. सिद्धार्थचे वडील आणि ताई दोघेही इंजीनिअर्स. .. सिद्धार्थने लेखक वगैरे होणं त्यांना मान्य नव्हतं. .. त्याने ही आपल्या सारखं इंजीनियर वगैरे च व्हावं असं त्यांना वाटायचं. .. यात प्रतिष्ठेचा प्रश्न वगैरे नव्हता. .. तर चिंता होती आपल्या मुलाच्या भविष्याविषयी. .. लेखन वगैरे त्यांना कधीच सेफ करियर वाटलं नाही. .. पण एक दिवस आदित्यने त्याच्या वडिलांना कन्वीन्स केलंच. .. आदित्यच्या डायरया कपाटातून बुकशेल्वस वर आल्या. .. फ़क्त आदित्य आणि तन्मयी साठी त्याने इंजीनियरिंग सोडली नाही, पण त्याला त्यात कधीच इंटरेस्ट नव्हता. .. आता जास्तीत जास्त वेळ तो आपल्या लिखाणाला द्यायला लागला. .. सिद्धार्थचं स्वप्न होतं एस.एस.सी. तुन शिक्षण घ्यायचं. .. आणि आता ते लवकरच पूर्णही होणार होतं. .. पण एस. एस. सी. त प्रवेश घेणं इतकं सोपी नव्हतं. .. त्या साठी एक विशिष्ट परिक्षा व्हायची. .. सिद्धार्थने ती परीक्षा नक्कीच क्लियर केली असती. .. पण एस. एस. सी. च्या प्रवेश परीक्षेची वयोमर्यादा होती १६-१८. .. सिद्धार्थचं वय २१. .. एस. एस. सी. त प्रवेश घेण्याचा आता फ़क्त एकच मार्ग उरला होता तो म्हणजे "ललित" स्पर्धा जिंकने. .. त्याकरिता वयोमर्यादा होती १६-२१. .. सिद्धार्थकडे ही शेवटची संधी होती. ..

तन्मयी, आदित्य आणि सिद्धार्थने एस. एस. सी. गाठलं. .. सहा राउंड्स मध्ये विभागलेल्या या स्पर्धेचे शेवटचे दोन राउंड्स इथेच होणार होते. .. सिद्धार्थला आजपर्यंत वाद विवाद स्पर्धेत कुणीही हरवु शकलं नाही. .. प्रत्येक विषयावार त्याच्याकडे काही ना काही उत्तर असायचं. .. आणि तसं ही ही स्पर्धा जिंकनं त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं. ..
तिघांनी कॉलेज च्या आत प्रवेश केला. .. कॉलेज ची वास्तु, भिंतीवरील नक्षी, वाल पेंटिंग्स वगैरे बघुन आदित्य आणि तन्मयी पार भारावून गेले. .. त्यांच्या तोंडून शब्द ही निघेना. .. सिद्धार्थ, तन्मयी आणि आदित्य ऑडिटोरियम च्या दिशेने वळले. .. प्रचंड गर्दी. .. आतिफ असलम च्या कॉन्सर्ट लाही आदित्यने इतकी गर्दी बघितली नसेल. .. ऑडिटोरियम खचाखच भरलेलं. .. जर्नलिस्ट आपले कैमेराज घेवून कार्यक्रम सुरु होण्याची वाट बघताना. .. आदित्यने घड्याळ बघितली. .. स्पर्धा सुरु व्हायला अर्धा तास अजून वेळ होता. .. मान्यवरांचं आगमन वगैरे झालं. .. सगळे जजेस् जगभरातले नावाजलेले साहित्यिक होते. .. बरोबर संध्याकाळी ७:३० ला स्पर्धा सुरु झाली. ..

राउंड ५. .. विषय - आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवंय. ..?

विषय वेळेवरच जाहिर करण्यात आला. .. तसा नियमच होता स्पर्धेचा. .. सिद्धार्थने युक्तिवाद मांडायला सुरुवात केली. ..

". ..काय हवंय या बद्दल आपण नेहमीच कंफ्यूज असतो. .. आपल्याला नक्की काय हवंय या पेक्षा काय नकोय हेच सांगायला सोपी असतं. .. आयुष्याचंही काही अंशी तसंच असतं... नक्की काय हवंय हे च आपल्याला मांडता येत नाही. .. काय नकोय हे च आपण सांगत राहतो आणि मग कधीतरी आपणच आपल्याला नकोसे व्हायला लागतो. .."
जवळपास ९ मिनिटे सिद्धार्थ बोलत होता. ..

सिद्धार्थने युक्तिवाद संपविला आणि टाळ्यांचा गडगडात झाला. .. सिद्धार्थच्या युक्तिवादासमोर समोरच्या विद्द्यार्थ्याचा युक्तिवाद कमी पडला आणि सिद्धार्थला फाइनल मध्ये एंट्री मिळाली. ..

फ़ाइनल राउंड. .. विषय - पुस्तक आणि आयुष्य. ..

फाइनल राउंड अर्थातच कठीण होणार होता. .. त्यातल्या त्यात फाइनल राउंड साठी काही विशेष नियम होते. .. राउंडचा वेळ होता फ़क्त ३ मिनिटे. .. आणि याच तीन मिनिटांत दोन्ही पक्षांना आपली मते मांडायची होती. .. एकमेकांचे युक्तिवाद खोडून काढायचे होते. ..
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही एस एस सी ची च एक विद्यार्थी फाइनल मध्ये पोहोचली होती. .. ओमिका प्रजापती, नाव अनाउन्स झालं. .. ओमिका स्टेज वर आली. .. सिद्धार्थ तिच्याकडे फ़क्त बघतच राहला. .. तिच्या नजरेचा तो तिथेच शिकार झाला असावा. .. सिद्धार्थ राजपूत, आपल्या नावाची अनाउन्स ऐकून सिद्धार्थ भानावर आला. .. सिद्धार्थ स्टेज वर चढला पण त्याची नजर मात्र तिच्यावरुन हटली नाही. .. म्हणतात जगात प्रत्येक व्यक्ति साठी देवाने कुणाला तरी बनवलंय, सोलमेट वगैरे म्हणतात नं असं कुणीतरी. .. त्या व्यक्तीला शोधायची गरज नसते. .. नियती स्वतःच त्यांची तुमच्याशी भेट घडवून आणते. .. कदाचित आपल्याला वाटू शकतं की ती व्यक्ती अनोळखी आहे म्हणून, पण हृदयाला हे नातं माहित असतं आणि हृदय कधी च चुकत नाही. .. कधी त्यांच्या स्पर्शाने असो की फ़क्त नजरेने आपल्याला ही हे नातं जाणवायला लागतं. .. सिद्धार्थ सोबतही असं च काहिसं झालं. ..

सर्वात आधी ओमिकाने युक्तिवाद मांडला. ..
". .. पुस्तकी ज्ञान हे खरंच खऱ्या आयुष्यात उपयोगी येतं का. ..? खोटे बोलू नये वगैरे मूल्ये आपण शाळेत, साने गुरूजी, महात्मा गांधी इ. च्या पुस्तकातुन शिकतो. .. पण खोटं बोलल्याशिवाय किती व्यवहार या जगात खरंच होतात? ५० रु. चं काम असलं तर २०० रु मागावे तेव्हा १०० रु देण्याचं आश्वासन मिळतं आणि प्रत्यक्षात मात्र ५० च मिळतात. .."

". .. खोटं बोलल्याशिवाय जगाचे बहुतेक व्यवहार चालत नाही, मान्य. .. पण ती मूल्ये त्यामुळे निरर्थक होत नाही. .. आणि त्यामुळे पुस्तकांचा आयुष्यात उपयोग होत नाहीच असा नाही. .. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसा च हा याला असणारा अपवाद मात्र आहे. .. चं प्र देशपांडे यांचं "तुमचं आमचं सेम असतं" हे नाटक वाचल्यावर स्त्री चं आयुष्य लग्नानंतर किती चेंज होतं ते शिकलो मी. .. शेक्सपिअर चं "अ मीड समर नाइट्स ड्रीम" शोकांतिका आहे की विनोदी नाटक? दुःखाला विनोदी पद्धतीने कसं मांडलं असेल त्याने. ..? सुख आणि दुःख दोन्ही ही एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात, बघण्याच्या दृष्टिकोनातून फ़क्त फरक पडतो. .. पावसा वरची तीच कविता कुणी प्रेम कविता तर कुणी विरह कविता म्हणून बघतो तसं. .. हे शेक्सपिअर च्या त्या नाटकातुन शिकलो मी. ..", सिद्धार्थ. ..

ओमिका फ़क्त आश्चर्याने सिद्धार्थकड़े बघत होती. .. सिद्धार्थ थांबला. .. जजेस स्तब्ध. .. टाळ्यांचा गडगडात. ..

To be continue. ..

©#heartbeats
-------------------------

No comments:

Post a Comment