एका अनोळखी शहरात,
अनोळख्याच वळणावर,
रस्त्याच्या पलीकडे,
त्या ओळखीच्या चेहऱ्यावर,
माझं लक्ष गेलं. ..
अनोळखी शहरात
तसं
ओळखीच्या चेहऱ्यांनी
भेटणं नाही नवं. ..
पण. ..
पण ओळखींच्या चेहऱ्यांनी
नव्यानेच भेटणं,
तिचं हसणं, तिचं बोलणं,
सारं जुनंच भासणं,
आणि. ..
आणि माझं अजूनही
जुनंच असणं. ..
हे काय आहे?
शेकडोंच्या गर्दीत तिला
अजूनही ओळखणं,
तिला बघून माझ्या पहिल्या
कवितेचं आठवणं,
तिच्या नजरेचं माझ्या
नजरेशी भिडणं,
आणि पावसाचं
अवकाळी सुरु होणं. ..
हे काय आहे?
मी विचारू का तिला?
ती नसतानाही
तिचं
माझ्या कवितेमधून उतरणं. ..
हे काय आहे?
© विशाल इंगळे
No comments:
Post a Comment