Friday, November 25, 2016

आज तिचे
पत्रं मिळाले
एकटीच ती हि आहे
मला कळाले

अजूनही ती लावते
माझेच नाव नावापुढे
नकळतच नयनातुनी
अश्रू गळाले

सुने सुने तिच्याविना जग
तिचेही सुनेच आहे
एक नाळ तिच्याशीच बाकी
सारे वळाले

पत्रात करते ती
उल्लेख 'प्रिय' म्हणुनी
"आहेस कसा तू?" प्रश्न
शेवटी 'तुझीच' लिहिले

© विशाल इंगळे


तुझ्यापरीच अपूर्ण
पूर्ण होणार नाही
लिही अशी गझल तू
कुणा कळणार नाही

लिही मनातले स्वतःच्या
कर व्यक्त तू स्वतःला
मागून शब्द उसने
गझल होणार नाही

देईल गझल तुला जे
दिले 'ती'नेही नाही
वेदना तिजशिवाय 'विशाल'
कुणीही घेणार नाही

© विशाल इंगळे

Sunday, November 20, 2016


एका अनोळखी शहरात,
अनोळख्याच वळणावर,
रस्त्याच्या पलीकडे,
त्या ओळखीच्या चेहऱ्यावर,

माझं लक्ष गेलं. ..

अनोळखी शहरात
तसं
ओळखीच्या चेहऱ्यांनी
भेटणं नाही नवं. ..

पण. ..

पण ओळखींच्या चेहऱ्यांनी
नव्यानेच भेटणं,
तिचं हसणं, तिचं बोलणं,
सारं जुनंच भासणं,

आणि. ..

आणि माझं अजूनही
जुनंच असणं. ..

हे काय आहे?

शेकडोंच्या गर्दीत तिला
अजूनही ओळखणं,
तिला बघून माझ्या पहिल्या
कवितेचं आठवणं,

तिच्या नजरेचं माझ्या
नजरेशी भिडणं,
आणि पावसाचं
अवकाळी सुरु होणं. ..

हे काय आहे?

मी विचारू का तिला?
ती नसतानाही
तिचं
माझ्या कवितेमधून उतरणं. ..

हे काय आहे?

© विशाल इंगळे

Tuesday, November 15, 2016


पावसा रुसुनी जाऊ नको असा. ..

तीही नाही, तू हि नाही, मी एकला. ..
सांग मी बोलायचे आता कुणा?

आठवणींचे ढग साचता मी,
अश्रूंना सांभाळू कसा?

पावसा रुसुनी जाऊ नको असा. ..

तिची नसे मिठी, तू तरी घे कवटाळुनी. ..
दिसती जगी न ऐसे, जाऊ दे त्यांना वाहुनी. ..

आरश्यास करेल मी, बहाणा कसा बसा. ..

पावसा रुसुनी जाऊ नको असा. ..

माझ्यावरी येऊ दे, तिला स्पर्शिलेल्या सरी. ..
नको दुसरे-तिसरे, मिळू दे एवढे तरी. ..

मिटवू कसा हृदयावरील, तिच्या नावाचा ठसा?

पावसा रुसुनी जाऊ नको असा. ..

पावसा रुसुनी जाऊ नको असा. ..

© विशाल इंगळे. ..
(+91)7558362871
(vishalingle25793@gmail.com)