एक कवी असतो
एक कविता असते
तो चुकतो, शब्द विसरतो
ती स्वतःच स्वतःला सावरते
उंची, लांबी, रुंदी सारंच
अगदी अचूक ठरवते
तो मांडतो शब्दांत फक्त
ती स्वतःच स्वतःला घडवते
तो भ्रमात असतो प्रेमाच्या
ती वास्तवता दाखवते
सूर्य चंद्र तारे वारा
हक्काचाच भासवते
थोडंही गुंतलं कि
तीच स्वप्न भंगवते
बऱ्याच गोष्टी अबोल
तरीही तिला ते कळते
तिच्याशिवाय त्याच्या आयुष्यात
दुसरे तरी काय असते?
तो कवी असतो
ती कविता असते
© विशाल इंगळे
No comments:
Post a Comment