(Dedicated to my bestest friends Vicky, Ram and Rahul . ..)
* **
"There is a Poetry in Love. ..
If there is a Love there is a Poem and vice versa. .."
- Vishal Ingle. ..
- --
ओमिकाच्या मैत्रिणी परत आल्या. .. तेव्हा खोलीतलं वातावरण खूपच शांत होतं. .. बाहेर सगळे आनंदात लग्नाच्या तयारीत लागलेले होते. .. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होणार होता. .. त्या पाठोपाठ हळदीचा कार्यक्रमही. .. ओमीकाच्या मैत्रिणी आल्या तेव्हा तिघांनीही सावरासावर करायचा प्रयत्न केला. .. सर्वांनी चेहऱ्यावर खोटंच हसू पांघरलं. .. ओमिकाच्या ओठांवर जरी हास्य होतं तरी तिच्या डोळ्यात दुःख होतंच. .. ते आदित्यच्या नजरेतून जसं लपलं नाही नं तसंच तन्मयीच्या नजरेतूनही. ..
"मी थोडा बाहेर थांबतो. .." म्हणत आदित्य खोलीबाहेर पडला. .. त्याच्या पाठोपाठ तन्मयीही काहीतरी बहाणा करून बाहेर आली. ..
आदित्य कार जवळ येऊन उभा राहला. .. वाड्याच्या प्रवेशद्वाराची सजावट चालू होती. .. वाड्याच्या प्रशस्त प्रांगणात मांडव टाकण्याची तयारीही होत होती. .. जवळपास सारेच धावपळ करत होते. .. तन्मयी आदित्य जवळ येवून उभी राहली. ..
"थंडी खूप आहे नं आज?",तन्मयी. ..
"हम्म. ..", आदित्य. ..
क्लिक. ..
"तुझ्या मते प्रेम काय आहे?", नोव्हेंबर च्या थंडीच्या सायंकाळी कोकणातल्या एका समुद्रकिनारी बसून वाळूवर काहीतरी गिरवतच ओमिकाने प्रश्न केला. ..
सिद्धार्थ कधी क्षितिजाच्या पल्याड रवीअस्ताची वाट बघत सायंकाळच्या तांबड्या आकाशाकडे तर कधी दूर किनार्याच्या दिशेने येताना दिसणाऱ्या बोटीकडे बघत होता. ..
आज लाटा शांत होत्या. .. ती दूर किनाऱ्याकडे येणारी एक बोट आणि वर आकाशात घरट्याच्या दिशेने येणाऱ्या पाखरांचा झुंड सोडला तर तिसरं तिथे कुणीच नव्हतं. .. गेला अर्धा-एक तास तरी ते तिथे असेच बसलेले होते. .. शांत. .. एकमेकांशी काहीही न बोलता. ..
अचानक ओमिकाला हा प्रश्न का पडलेला असेल कोण जाणे. .. पण या अनपेक्षित प्रश्नाने सिद्धार्थचं लक्ष मात्र वेधून घेतलं. .. सिद्धार्थने ओमिकाकडे बघितलं. .. तिची नजर अजूनही खालीच होती. .. वाळूवर कश्यातरी रेघोट्या ओढतच तिने परत तोच प्रश्न केला. ..
"सांग नं, तुला काय वाटतं? प्रेम काय आहे. ..? व्हॉट इज लव्ह? ??"
तिने हळूच नजर वर केली. .. सिद्धार्थच्या नजरेला तिची नजर भिडली. .. तिच्या नजरेत जिज्ञासा होती. .. सिद्धार्थने एक लांब श्वास घेतला आणि परत क्षितिजाकडे बघितलं. ..
"प्रेम. ..? प्रेम अनुभवायाचं असेल नं तर खूप सोपी आहे. .. व्याख्या करायची म्हंटलं नं तर जवळजवळ अशक्यच. .. ओशो म्हणतो, माश्याला विचारा 'समुद्र काय आहे?' तो म्हणेल 'हा समुद्र आहे. .. हा अवतीभवतीचा, सगळीकडे पसरलेला समुद्रच. .. तोच तो. ..!' पण तुम्ही विचाराल 'समुद्राची व्याख्या तू कशी करशील?' तर कठीणच. .. प्रेमाचंही तसंच. .. प्रेम म्हणजे समुद्र. .. मी त्या समुद्रातील फक्त एक मासा. .. मी कसं सांगू प्रेम म्हणजे काय?"
अजूनही त्या अथांग पसरलेल्या समुद्राकडेच बघत तो थोडासा हसला, परत ओमिकाकडे बघितलं. ..
"आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी अनुभवता येतात, जगता येतात. .. त्यांची व्याख्या करता येत नाही, त्यांना व्यक्त करता येत नाही. .. आणि प्रेमापेक्षा सुंदर या जगात दुसरं ते काय?"
ओमिका ला पुस्तकी भाषा आवडत नाही. .. तिला अपेक्षित उत्तर मिळालेलं नसावं कदाचित, तिच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव सिद्धार्थ ने अचूक नेमले. ..
"तरीही तुला ऐकायचंय म्हणून सांगतो. ..", ओमीकाच्या गालावर लाली बघून सिद्धार्थच्याही ओठांवर हसू आलं. .., "मी तुझ्यासोबत तास-अन्-तास असाच बसलो राहू शकतो. .. तुझ्या डोळ्यात बघत. .. एकही शब्द न बोलता. .. अबोल. .. वेळ-भान सगळं विसरून. .. तर मी तुझ्या प्रेमात आहे. .."
सिद्धार्थचं बोलणं संपतं न संपतं तोच ओमिका चा मोबाईल वाजायला लागला. .. ओमिकाच्या मोबाईल स्क्रीन वर तन्मयी चं नाव फ्लॅश होत होतं. ..
सूर्य मावळला होता. .. आकाशातील पाखरे घरी परतली होती. .. दूरवरून दिसणारी ती बोट नाहीशी झालेली. .. दुसरीकडून चंद्र उगवला होता. .. त्याच्या शितल छायेत समुद्र चमकत होता. .. किनाऱ्यावर कुठूनतरी काजवे येत होते. .. समुद्राच्या लाटा भरती-ओहोटीचा लपंडाव खेळत होत्या. .. सिद्धार्थ आणि ओमिका परत निघाले. .. त्यांची पावले वाळूवर उमटत होती आणि लगेच आलेल्या लाटेने ती मिटत हि होती. .. अश्याच एका लाटेने ओमिकाने ओढलेल्या त्या रेघोट्यांनी उमटलेले ते शब्दही मिटले, "व्हॉट इज लव्ह?". ..
© विशाल इंगळे. ..
* **
"हा क्षण" चे आधीचे भाग वाचण्याकरीता डाउनलोड करा :
Http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ha_kshan_vishal_ingle.pdf