(हि कविता माझे प्रिय मित्र आणि कवी , पियूष वानखडे आणि सुनील उके यांना समर्पित. ..)
आज पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांवर लिहिलं काही
न दिसावी कुणाला म्हणुनी पुन्हा लपवून ठेवली वही
प्रेम करणे, तिच्यावर लिहिणे म्हणजेच एक गुन्हा
कविता म्हंट्लं म्हणजे तिच्यावर लिहिणे आलंच पुन्हा
शब्दांमागच्या कोवळ्या भावना घेईल का कुणी समजून?
कि गैरसमजच होतील फक्त कविता वाचून?
तिच्या डोळ्यांमधल्या माझ्या ओठांवरचे हसू
तिच्या असण्याने माझी बहरलेली दुनिया, शकेल का त्यांना दिसू?
वारा स्पर्शूनी मज जेव्हा तिच्या बटांशी खेळतो,
सावरता मग ती थोडी हसून लाजते
बिलगतो अलगद जेव्हा तो ती तिच्या ओठांना,
त्या क्षणी ईर्ष्या मज वाऱ्याचीही वाटते
पावसात ती हमखास भिजणार
हात धरून तिच्यासोबत, मलाही पावसात खेचनार
गालावरून तिच्या ओघळतील थेंब जेव्हा,
पुन्हा मला एकदा थेंब व्हावेसे वाटणार
तिच्यासोबत असल्यावर माझे, असणे नसल्यासारखे
दिवसही वाटतात अगदी काही क्षणांसारखे
तिच्यासोबत असताना मी अगदी तिच्याच सारखा वागणार
सारं सारं हे मी माझ्या कवितेत मांडणार
शब्दांमागचं हे सारं सारं त्यांना कळायलाही हवं,
कवितेमधून त्यांनी मला समजायला हि हवं
© विशाल इंगळे
No comments:
Post a Comment