"तिच्यावर का नाही करत एखादी कविता?"
एकदा एक मित्र सहज म्हणाला होता. ..!
त्याला काय सांगू, किती वेळ प्रयत्न केला,
तरीही पडला अपुरा शब्दांचा माझ्या पेला. ..
कधी शब्द अपुरे पडले,
कधी सुचलेच नाही काही,
तिच्यावरची कविता कधी पूर्णच झाली नाही. ..
एकदा म्हंट्लं करावा प्रयत्न,
अपूर्ण च का होईना पण तिच्यावर लिहायचा,
हृद्यातल्या नक्षत्राला शब्दांत मांडण्याचा. ..
नक्षत्र? छे. ..!
तिच्या डोळ्यांशी तरी ते बरोबरी करतील का?
बघताच त्यांस कुणी स्वतःलाच भुलतील का?
नक्षत्रांना हे असं भुलविनं जमणार नाही,
वाट्लं हि ही कविता कधी पूर्ण च होणार नाही. ..
वाट्लं हि ही कविता अपूर्ण च राहली,
इतक्यात गॅलरीतली काही खुललेली फुले दिसली. ..
जशी गुलाबाची फुले हि
आली होती बहरून,
फक्त एका स्पर्शानेही तिच्या मन जातं मोहरून. ..
कधीच न कोमेजतील असं उमलणं त्यांना जमेल का?
आयुष्यभर दरवळणारा गंध ते देतील का?
छे, फुलांनाही जमणार नाही हे असं काही,
शब्दांत मांडणे तिला कदाचित जमणार च नाही. ..
दिवस असाच गेला अन रात्र झाली,
कविता होऊन मग ती स्वतःच मजपाशी आली. ..
देवघरातल्या दिव्याची ती वात असावी,
वाटतं कदाचित ती रात असावी. ..
येताना नक्षत्रांची रास घेऊनी येते,
जातानाही डोळयांना नवीन पहाट देवूनी जाते. ..
© विशाल इंगळे. ..
No comments:
Post a Comment