रिमझिम पावसात
तुझ्यासोबत भिजलेली संध्याकाळ आठवते
उधाणलेल्या समुद्राच्या लाटांमधून चालताना
बेभान वारा झालेले तुझे मोकळे केस
पावसाला दव बनवून झेलनारे तुझे ओठ
तुझ्या हाताचा उबदार स्पर्श
ओठी लताचं सागर किनारे
निसर्गाने आर डी बर्मन होवून दिलेली साद
तुझ्या डोळ्यात नाहीसा झालेलो मी
गुलाबी रंगाची ती एकच सायंकाळ असावी
आता जगजीत च्या गझल ऐकत जागलेल्या रात्रीत
ती संध्याकाळ
आणि
त्या पावसाला
साद घालत असतो