Friday, January 8, 2016


नजरेने कळतो म्हणे नजरेचा नेम. ..
बघ तुला दिसतं का माझ्या डोळ्यातलं प्रेम. ..

प्रत्येकच गोष्ट थोडीच वेड्या नजरेनं कळते,
कधी कधी शब्दांत मांडावं हि लागतं. ..
वहितलं हे हि पान कधी कधी उलगडावं लागतं. ..

हे हि बोलावं लागलं तर काय अर्थ आहे?
नजरेने जो कळत नाही न प्रेमात
तो अर्थच व्यर्थ आहे. ..

अर्थ कळला नं तरी ओठांना गप्प रहावं लागतं,
नजरेनेच नजरेला मग उत्तर द्यावं लागतं. ..
नजरेचा होकार मग नजरेलाच कळत नाही,
म्हणून ओठांवर हे हि आणावं लागतं. ..

होकार तर कळला पण बंधनांचं काय?
हृदयाचं ठीक पण स्पंदनांचं काय?

हृदयासोबत घे स्पंदनांनाही सावरून. ..
काही बंधनं तोडणं शक्य नसतं,
बस्स शेवटचं घे मला समजून. ..

-
© विशाल

नजरेत तुझ्या
भुललो मी मला
प्रेमात तुझ्या
गुंतलो मी असा

विसरु मी कसा
ना कळे

प्रत्येक क्षणी
तू च ध्यानी मनी
पहिल्या पावसातल्या
आठवणी

विसरू मी कसा
ना कळे

ये ना
सांग ना
माझ्यातल्या तुलाच तू
घेऊनी जा ना

© विशाल इंगळे