गावाच्या बाहेर घेवून जाणाऱ्या रस्त्यावर एक बाइक धावत होती. .. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी, हेडलाइट चा प्रकाश पोहोचत होता तेवढा रस्त्याच्या भाग सोडला तर दूरदूर पर्यंत चहुबाजूंनी फक्त काळोख. .. रात्रीचा एक वाजला असावा. .. मागच्या सीट वर सारिका राहुल ला घट्ट पकडून बसली होती. .. आता ते दोघेही गावापासून बरेच दूर आले होते. .. जवळचंच एक दुसरं गाव लागणार होतं. .. गावाच्या आधीच येणाऱ्या धरणापासून त्यांची बाइक धावत होती. .. धरणातील पाणी अगदी शांत वाटत होतं. .. आकाशातील चंद्र आणि चांदण्यांचं प्रतिबिंब पाण्यावर पडलं होतं. .. किती सुंदर दृश्य दिसत आहे, सारिका च्या मनात विचार आला. .. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. .. धरणाकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा स्पर्श तीला हवाहवासा वाटत होता. .. तीने राहुलला अजुन घट्ट मिठी मारली. .. पण क्षणभरातच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, डोळे पाणावले. .. काही तासांआधीची दृश्ये तिच्या नजरेसमोर यायला लागली. ..
घड्याळात रात्रीच्या बाराचे ठोके पडले. .. राहुलने भिंतीवरच्या घड्याळावर नजर टाकली. .. बेडवर पडल्या पडल्या तो या कड्यावरुन त्या कड्यावर, त्या कड्यावरुन या कड्यावर करत झोपण्याचा प्रयत्न करत होता; पण झोप काही येईना. .. रोज सारखाच आज पण गैरेज वरुन परतताना फुल्ल टल्ली होवून घरी आला होता. .. काही दिवसांपासून सारिका सोबतच्या बिघडलेल्या संबंधामुळे तो जास्तच तनावाच्या मनस्थितीत होता. .. इतक्यात जोरजोरात दार ठोठावल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. .. इतक्या रात्री कोण आलं असेल झोप मोड करायला त्याने विचार केला, त्याने दाराची कडी काढली, दार उघडलं. .. समोर सारिका, तीची आई आणि बाबा. .. राहुल ला काय घडतंय ते कळेना, सारिका आणि तिच्या आई-वडिलांना सोबत बघुन त्याची पूर्ण नशा उतरली. .. आता काय घडणार किंवा काय घडलं असावं याचा विचार त्याच्या डोक्यात येण्याच्या आधीच त्याच्या दोन मुस्काटात बसल्या. .. राहुलचे आई बाबा पण दार ठोठावण्याच्या आवाजाने जागे होवून समोरच्या रूम मध्ये पोहोचले होते. .. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सारिका आणि राहुलचे प्रेम संबंध चालू होते. .. राहुलमुळे सारिकाला दिवस गेले. .. सारिकाला दोन महिन्यांचे दिवस गेल्याचं तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं आणि राहुलमुळे दिवस गेल्याचं माहित पडल्यावर तीच्या आई बाबांनी तिच्यासमवेत राहुलचं घर गाठलं होतं. .. ". ..तुझ्यामुळे हिला दिवस गेलेत, आता हिला तूच सांभाळ, तोंड दाखवायला जागा नाही ठेवली कारटीने. .." असंच काहिसं बोलून तिचे आई वडील तीला तिथेच टाकून निघुन गेले. ..
अचानक गाडीचा ब्रेक लागल्याने सारिका भानावर आली. .. गावाच्या बाहेर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला जोडणाऱ्या हाईवे
"गाडी का थांबविलीस?",सारिका. ..
"आपण गाव सोडून तर जातोय पण आपल्याकडे पैसेही नाहीत. .. तू एक काम कर, या हाईवे ने समोर जा. .. जवळच एक ढाबा आहे तिथे थांब. .. मी गावातुन थोड्या पैश्याची मदत घेवून लवकरच परत येतो. ..", राहुलचे ओठ थरथरत होते, चेहऱ्यावरचे भाव वेगळेच. ..
सारिका काही ही बोलली नाही. .. राहुलने गाडी पलटवली. .. एकदा तिच्याकडे बघितलं, बाइक स्टार्ट केली. .. अंधारात परत गावाकडे जाणाऱ्या बाइक कडे सारिका ती दिसेनाशी होईपर्यंत बघत राहली. .. सारिका ढाब्याच्या दिशेने चालायला लागली. .. रात्री एक ची वेळ, चहु बाजूंनी नुसता अंधार. .. थोडं दूर गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर समोरून येणाऱ्या फोर व्हीलर च्या हेड लाइट चा प्रकाश पडला. .. तीने डोळ्यांसमोर हात केला. .. उगाचंच जवळून जाताना त्या फोर व्हीलर चा वेग कमी झाल्याचा तीला भास झाला. .. दूर दूर पर्यंत कुणीही दिसत नव्हतं, तिला आता भीती वाटायला लागली, छातीत धडधडायला लागलं. .. तिने राहुलचा नंबर डायल केला; उत्तर नाही. ..
क्लिक. ..
सारिका अमोल ची वाट बघत होती. .. ठरलेल्या वेळेपेक्षा दीड तास जास्त झाला तरी अमोल चा पत्ता नाही. .. सारिका ने अमोल ला फोन लावला. ..
"अरे, किती वेळ? कुठे आहेस तू? ?? निघते मी आता. ..", सारिका. ..
"अगं थांब. .. सांगितलं नं गैरेज वर आहे म्हणून. .. १५ मिनिटे थांब फक्त. ..", अमोल. ..
जवळपास २० मिनिटांनंतर अमोल कॉलेज समोरच्या हॉटेल जवळ पोहोचला. .. सोबत कुणीतरी होतं. ..
"ये सॉरी यार, बाइक मध्ये मेजर प्रोब्लेम आलाय, खुप खर्च येणारेय वाटतं. .. म्हणून लेट झालो. .. हा माझा मित्र राहुल. .. याच्याच गैरेज वर टाकलीय बाइक. .. आणि याच्या बाइक ने आलो आम्ही मग आता. ..",अमोल. ..
"ओळखते मी याला. .. आमच्याच गावात राहतो हा. ..", सारिका. ..
"चला जमलं मग. .. काही विषयच नाही. .. ये पण भूक लागलीय यार खुप, काहीतरी आर्डर करतो आधी. .. तुम्ही काय घ्याल? राहुल? ??", अमोल. ..
"काही पण चालेल. ..", राहुल. ..
"माझ्यासाठी काहीच नकोय. ..", सारिका. ..
अमोल आर्डर देण्यासाठी काउंटर कडे जायला लागला. ..
"मला ओळखतेस तू? आश्चर्य आहे. ..", राहुल. ..
"आश्चर्याचं काय आहे त्यात. .. छोटंसं गाव आहे आपलं. .. आणि त्यातल्या त्यात तू तर तसाच त्या तिच्या चक्कर मध्ये. ..",सारिकाला आपण काहीतरि चुकीचं बोलल्याची जाणीव झाली. ..
"बदनाम झालोय असंच नं?", राहुल. ..
शांतता. .. काही वेळ कुणीही बोललं नाही. .. अमोल टेबलपाशी परतला आणि विषय बदलला गेला. ..
क्लिक. ..
सारिका ढाब्याजवळ पोहोचली. .. ३-४ वेळा राहुल चा नंबर ट्राय करून झाला होता. .. राहुल उत्तर देत नव्हता. .. सगळीकडे अंधार, ढाब्यावर एकटिच बसलेली. .. ४-५ मिनिटांनी एखादा ट्रक किंवा फोर व्हीलर रस्त्याने जायची आणि ती जवळ यायला लागली की सारिकाच्या छातीत धडधडायला व्हायचं. .. मनात भितीची लहर उठायची. .. शेवटी राहुल ने कॉल उचलला. ..
"ये कुठे आहेस तू? ये न लवकर. .. मला भीती वाटतेय रे. ..",सारिका. ..
"माझं येणं होणार नाही आता, तुला वाटत असेल तिकडे निघुन जा, फक्त परत येवू नकोस. ..",राहुल ने कॉल कट केला. ..
सारिका ला धक्काच बसला. .. राहुल असा करेल असं तीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ..
क्लिक. ..
मुसळधार पाऊस. .. राहुल आणि सारिकाने रस्त्याच्या कडेला च असणाऱ्या एका पिम्पळाच्या झाडाखाली आश्रय घेतला. .. दोघेही पावसाने आधीच भिजुन गेलेले होते. .. कुणीही काही वेळ काही च बोलत नव्हतं. ..
"याच पिम्पळाच्या झाडाखाली सिद्धार्थाला बोधी प्राप्ती झाली ना?",सारिका. ..
"पिम्पळाच्या झाडाखाली झाली. .. पण या नाही. .. हे पिम्पळाचं झाड तितकं जुनं नाही वाटत. ..", राहुल. ..
"मस्करि नको करू. .."
"मी? मी करतोय का मस्करी?"
"नाही तर काय मी करतेय?"
"नाही तर काय? काही पण काय प्रश्न विचारतेस? ??"
"तुला असंच बोलायचंय का माँझ्यासोबत?"
काही वेळ शांतता. .. पाऊस मात्र वाढत होता. ..
"राहुल, तू समजून घे ना रे. .. अमोल आणि मी. ..", सारिकाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच राहुल ने तीला स्वतःकडे ओढुन घेतलं. ..
सारिका राहुलच्या मिठीत होती. .. न जाने का पण तीने राहुल ला विरोध केला नाही. .. राहुल ने तिच्या डोळ्यात डोळे टाकून बघितलं. .. त्यांची नजर एक झाली. .. काळीज धडधडायला लागलं. .. हृद्याचे ठोके वाढत असल्याचं तीला स्पष्ट जाणवत होतं. .. तिने डोळे मिटले. .. तिच्या गुलाबांच्या पाकळ्यांसमान ओठांवर त्याच्या ओठांचा स्पर्श झाला. .. सारिकाने ही मीठी घट्ट केली. ..
"मला नाही माहिती, हे चुकीचं आहे की बरोबर. .. पण प्रेमात पडलोय मी तुझ्या. .. आणि मला माझ्या आयुष्यात. ..", राहुल चं वाक्य पूर्ण न होवू देत सारिकाने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. ..
राहुल ने परत एकदा तिच्या डोळ्यांत बघितलं. .. पाऊस कमी व्हायला लागला होता. ..
क्लिक. ..
सारिका ने पर्स मधून औषधाची बॉटल बाहेर काढली. .. झाकण उघडलं आणि पूर्ण बॉटल एका घोटात रिकामी केली. .. रिकामी बॉटल रस्त्यावर घरंगळत होती. .. बॉटल च्या लेबल वर कैपिटल लेटर्स मध्ये लिहिलेलं होतं. ..,
POISON. ..!
© विशाल इंगळे & विपुल वर्धे. ..